झिको यांचे एफसी गोवासाठी 20 गुणांचे लक्ष्य

गोवा, दिनांक 29 ऑक्टोबर 2016: एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक झिको यांनी हिरो इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याच्या उद्देशाने संघासाठी 20 गुणांचे लक्ष्य बाळगले आहे. एफसी गोवाचे सध्या पहिल्या सहा सामन्यानंतर फक्त चार गुण आहेत, परंतु रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दिल्ली डायनॅमोजविरुद्ध विजय मिळविल्यास संघाची मोहीम पुन्हा योग्य मार्गावर येईल असा विश्वास ब्राझीलियन प्रशिक्षकांना वाटत आहे. मला वाटतं, की 20 गुण मिळाले तर पहिल्या चार संघांत स्थान मिळेल. सध्याचे निकाल पाहता, त्याहून कमी गुण मिळाले तरी आम्ही उपांत्य फेरी गाठू शकू, असे झिको यांनी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले. एफसी गोवाने आतापर्यंत घरच्या मैदानावरील दोन्ही सामने गमावले आहेत. शेवटच्या मिनिटाच्या गोलमुळे गोव्यातून एफसी पुणे सिटीला पूर्ण गुणांसह निघता आले आणि मागील सामन्यात केरळा ब्लास्टर्सने झुंजार खेळ करत विश्रांतीला एका गोलने पिछाडीवर पडूनही विजय मिळविला. या धक्क्यांनंतरही आपला संघ उसळी घेऊ शकतो हा विश्वास झिको यांना वाटत आहे. मला वाटते, की केवळ दिल्ली डायनॅमोजविरुद्धचा हाच सामना नव्हे, तर सारेच सामने महत्त्वाचे आहेत. सध्या आम्ही ज्या स्थितीत आहोत, त्यावरून आम्हाला आता जिंकणे जास्त अत्यावश्यक आहे. हा सामना जिंकण्याची क्षमता आमच्याच आहे. पहिल्या टप्प्यातील मोहीम सात गुणांसह संपवायची आणि दुसऱ्या टप्प्यात, नव्या स्पर्धेप्रमाणे विचार करून मोहीम पुन्हा मार्गस्थ करावी लागेल, असे झिको म्हणाले. दिल्ली डायनॅमोजसाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. जियानल्युजी झांब्रोटा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ मागील पाच सामन्यांत विजयाविना आहे. दिल्ली डायनॅमोजने मोहिमेची सुरवात दणक्यात करताना चेन्नई येथे चेन्नईयीन एफसीला 3-1 असा धक्का दिला, मात्र गतविजेत्यांना नमविल्यानंतर त्यांनी मागील पाच सामन्यांतून फक्त चार गुण मिळविले आहेत. आमच्या स्थितीने मी निराश झालेलो नाही. चांगला दृष्टिकोन बाळगणे आणि सकारात्मक राहणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. याच तऱ्हेने वाटचाल केल्यास आम्ही चांगले निकाल नोंदवू शकू, असे झांब्रोटा यांनी सांगितले. त्यांच्या हाती असलेली लढत विशेषतः एफसी गोवाविरुद्धच्या लढतीचे महत्त्व इटालियन प्रशिक्षक पक्के जाणतात. एफसी गोवानेही आणखी एक विजय मिळविण्याचा निर्धार केला आहे. आम्हाला माहीत आहे, की हा सामना गोव्याला जिंकायचा आहे, त्यामुळे त्यांचे आव्हान कायम राहील. हा सामना उत्सुकतेचा असेल, असे झांब्रोटा म्हणाले. विजय मिळविल्यास 10 गुणांसह दिल्ली डायनॅमोज पहिल्या चार संघांत येतील हे पक्के आहे आणि पहिल्या तीन संघाच्या जवळपास राहतील हे नक्की होईल. दुसरीकडे एफसी गोवाने विजय मिळविल्यास, त्यांना सात गुणांसह एफसी पुणे सिटीच्या वर जागा मिळेल, पण झिको जाणतात की दुसऱ्या टप्प्यास सुरू होताना विजय महत्त्वाचा दुवा असेल.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *