रोमांचक सामन्यात भारताची सरशी, युवराज धोनीने जिंकली भारतासाठी मालिका

युवराज सिंघचे दीड शतक, धोनीचे शतक आणि भारताचा निसटता विजय ही ठरली आजच्या सामन्यातील वैशिष्टे. भारताचा ३८१ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या इंग्लंड संघाने ३६६ धावांपर्यंत मजल मारली. परंतु शेवटच्या २-३ षटकांत भारताच्या गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी भारताला विजयश्री खेचून आणले. कट्टक: १० चेंडू शिल्लक आणि इंग्लंडला २७ धावांची गरज. इंग्लंडचा शतकवीर कर्णधार इयान मॉर्गन खेळपट्टीवर. बुमराचा तो अचूक निशाणा आणि भारत सामन्यात परत. अशी काही अवस्था झाली आजच्या सामन्यात आणि विराट कोहलीच्या भारतीय संघाने अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाला १५ धावांनी मात देत सामन्यासह मालिकाही खिशात घातली. आजच्या सामन्यात खास आकर्षण ठरलं ते युवराज सिंघचं दीड शतक व धोनीचं शतक. नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित करणाऱ्या इंग्लिश संघाने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची कंबर मोडली. मागच्या सामन्यात काही विशेष न करता आलेल्या के. एल. राहू व शिखर धवन यांना कोहलीने विश्वासाथ घेऊन पुन्हा एकदा संधी दिली. परंतु दोघांनाही या संधीचा फायदा घेता आला नाही. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना माघारी धारत भारताची अवस्था ३ बाद २५ अशी केली. भारताला मोठ्या भागीदारीची गरज असताना सर्वात अनुभवी असलेले दोन भरवश्याचे फलंदाज महेंद्र सिंघ धोनी व युवराज सिंघ यांनी संघाला सावरत मोठी धावसंख्या उभारून दिली. युवराजने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करीत १५० धावा केल्या तर धोनीनेही एकदिवसीय सामन्यांत २०० षटकार खेचत १३४ धावा केला. दोघांच्या २५६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर ३८१ धावांचा मोठा डोंगर उभारला. मागच्या सामन्यात ३५० धावा करणाऱ्या इंग्लंड संघाने भारताच्या धावांचा पाठलाग करताना विस्फोटक सुरुवात केली. मागील सामन्यात चमकणाऱ्या अलेक्स हेल्सला या वेळी मोठी खेळी करता आली नाही. चौथ्या षटकात बुमराच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देत तो १२ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्मात असलेल्या जो रूटने सलामीवीर जेसन रॉयच्या साथीने इंग्लंडला पटापट धावा जमून दिल्या. दोघांनी दुसर्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी रचित डावाला आकार दिला. रूट बाद झाल्यानंतर कर्णधार मॉर्गनने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि इंग्लंडला विजयाकडे नेण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याने सहाव्या गड्यासाठी मोईन अलीसोबत ९३ तर आठव्या गड्यासाठी प्लंकेट सोबत महत्वपूर्ण ५० धावांची भागीदारी केली. ४९ व्या षटकात बुमराने टाकलेल्या एका यॉर्करवर चोरटी धाव घेण्याच्या नादात मॉर्गन बाद झाला आणि सामन्याची गणिते बिघडली. शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमारने टिच्चून गोलंदाजी करीत भारताला रोमांचक झालेल्या सामन्यात १५ धावांनी विजय मिळवून दिला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने दोन सामने जिंकत मालिका आपल्या खिशात घातली. मालिकेतील शेवटचा सामना रविवारी कोलकाता येथील इडन गार्डन येथे होईल. भारत या सामन्यात काही नवीन चेहऱ्यांना संधी देईल अशी आशा आहे.  ]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *