पंचाहत्तर वर्षे अन्नपाणी न घेणाऱ्या आजही जीवित असलेल्या साक्षात्कारी महात्म्याची सत्यकथा

श्री प्रल्हाद जानी उर्फ माताजी, एक योगी सत्पुरुष. राहणार अहमदाबाद. सध्याचे वय ८६ वर्षे. माउंट अबू आणि गिरनार येथे वयाच्या अकराव्या वर्षी त्यांना अंबामातेचा साक्षात्कार झाला आणि तेंव्हापासून अन्न पाणी यांचा संबंध कायमचा सुटला. मागील पंचाहत्तर वर्षे… होय, पंचाहत्तर वर्षे अन्नग्रहण नाही, पंचाहत्तर वर्षे पाणी सुद्धा पिले नाही. त्यामुळे मलमूत्र विसर्जनही नाही. तरीसुद्धा प्रकृती तुमच्या आमच्या सारखीच ठणठणीत. २००३ साली अहमदाबादेतील नामवंत स्टर्लिंग हॉस्पिटल मध्ये तज्ञांच्या समितीने अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून सलग दहा दिवस तपासण्या केल्या, अखंड व्हिडीओ रेकॉर्डिंग केले, पण रहस्याचा उलगडा झाला नाही. विज्ञानाने हात टेकले. विज्ञानाच्या कक्षेबाहेरील हा विषय असून त्याचे कारण समजून घेण्यास आम्ही आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्र सक्षम नाहीत असा अधिकृत अहवाल सहभागी डॉक्टरांनी दिला. (मेडिकल टेस्ट रिपोर्टची लिंक शेवटी दिली आहे) या प्रकरणाने जगातील वैद्यकीय जगतामध्ये एकच खळबळ माजली. मानवी शरीराचा हा विलक्षण चमत्कार आहे हे पाश्चात्यांनी मान्य केले. बीबीसी, टेलिग्राफ, सीएनएन या वृत्तपत्रांनी याची ठळक नोंद घेतली. त्यावर विशेष वृत्तांत तयार केले. सेक्युलर भारतीय माध्यमांनी मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. काही भारतीय महाभागांनी अत्यंत वस्तुनिष्ठ, काटेकोर वैद्यकीय तपासण्या आणि अहवालावर प्रश्न उपस्थित केले. पाश्चात्य जगतामध्ये मध्ये मात्र यावर खुलेपणाने साधक बाधक चर्चा होत राहिली. ऑस्ट्रेलियातील P.A. Straubinger या दिग्दर्शकाने त्यांच्यावर IN THE BEGINNING THERE WAS LIGHT ही डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली. निव्वळ सत्यकथन करणाऱ्या, कुणाचीही बाजू न घेता समतोल भाष्य असलेल्या या फिल्मचे जगभर स्वागत झाले. (या फिल्म चे ट्रेलर युट्युब वर उपलब्ध असून त्याची लिंक शेवटी दिली आहे) खुद्द केम्ब्रिज विद्यापीठाने सुद्धा या प्रकरणात रस दाखवला. २०१० साली पुन्हा सलग पंधरा दिवस श्री प्रल्हाद जानी यांची अत्यंत काटेकोर तपासणी केली गेली. यावेळी निकष अधिक कठोर ठेवले गेले. अहमदाबादेतील डॉक्टरांसोबत संरक्षण मंत्रालयाच्या Indian Defense Institute of Physiology and Allied Sciences (DIPAS) मधील तज्ञांसह एकूण ३५ जण या तपासण्यांमध्ये सहभागी होते. एवढे करूनही रहस्यभेद काही झालाच नाही. त्याचा अहवाल अद्यापही प्रकाशित केला गेला नाही. श्री प्रल्हाद जानी आजही आधुनिक विज्ञानासाठी एक चालते बोलते रहस्य बनले आहेत. या सर्व तपासण्यांमध्ये श्री प्रल्हाद जानी यांनी बिनशर्त सहकार्य केले आहे. ते सहजपणे सांगतात की साक्षात्कारामुळे सूर्यप्रकाशापासून उर्जा निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या शरीरामध्ये निर्माण झाली आहे. यात काही विशेष नसून वनस्पती सुद्धा याच पद्धतीने आपले अन्न मिळवतात. त्यामुळे मला बाहेरून अन्न-पाणी घ्यावे लागत नाही. पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेता त्यांच्या मुत्रापिंडामध्ये लघवी तयार होते आणि ती परत शरीरामध्ये शोषली जात असल्याचे विलक्षण अदभूत निदान वैद्यकीय तपासण्यांमध्ये झाले. आधुनिक विज्ञानासाठी हे मोठे अद्याप न सुटलेले कोडे आहे. मानवी शरीराच्या क्षमतांना आव्हान देणाऱ्या या रहस्याची उकल करण्याचा विडा पाश्चात्यांनी उचलला आहे, ते त्यांच्या पद्धतीने सत्याचा शोध घेत आहेत, भारतीय आघाडीवर मात्र सामसूम आहे. सत्याचा सामना करण्यापेक्षा अज्ञानाच्या अंधारात डोळे मिटून बसणे भारतीय अभ्यासकांनी पसंद केले आहे. सत्याचा स्वीकार केला तर आपला पुरोगामीपणाचा ढोंगी मुखवटा टराटरा फाटेल म्हणून सत्याकडे पाठ फिरवून ही मंडळी बसली आहेत. वास्तविक भारतीय माध्यमांनी, अभ्यासकांनी हे प्रकरण उचलून धरायला हवे होते. भारतातील आध्यात्मिक साधना, योगाभ्यास, साक्षात्कार यांची सत्यता जगाला पटवून देण्यासाठी इतके आदर्श आणि वैद्यकीय कसोट्यांवर सिध्द झालेले भारतातीलच काय जगातीलही हे एकमेव उदाहरण असावे. जगभरातील संशोधक याचा छडा लावण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे तर्क लढवीत आहेत. जगातील सर्वाधिक रहस्यमय दहा प्रकरणांमध्ये हे प्रकरण दुस-या क्रमांकावर आहे. श्री प्रल्हाद जानी हे जगभर किती मोठ्या विस्मयाचा आणि चर्चेचा विषय बनले आहेत आणि या प्रकरणाची जागतिक व्याप्ती किती मोठी आहे हे जाणून घ्यायचे असेल तर गुगल वर फक्त Prahlad Jani अशी सर्च देऊन येणारे रिझल्ट पहा. Whatsapp किंवा Facebook वरून व्हायरल होणाऱ्या निरर्थक लिखाणाची ही पोस्ट नक्कीच नाही. आपली आध्यात्मिक साधना प्रणाली, साक्षात्कार यांच्या दिव्यत्वाची ओळख आपल्यालाच नसेल तर आपण जगाला काय सांगणार? विज्ञानाला नतमस्तक व्हायला भाग पडणाऱ्या या प्रकरणाची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी हाच हेतू या मागे आहे. धन्यवाद! सदानंद कुलकर्णी, पुणे. स्टर्लिंग हॉस्पिटल अहमदाबाद ने श्री प्रल्हाद जानी यांच्या २००३ मध्ये केलेल्या तपासण्या आणि त्याचे अहवाल सार्वजनिक केले आहेत. त्याची ही लिंक आहे. http://www.sudhirneuro.org/files/mataji_case_study.pdf विकिपीडिया पेजची लिंक: https://en.wikipedia.org/wiki/Prahlad_Jani ऑस्ट्रलियन फिल्म मेकरने केलेल्या डॉक्युमेंटरी फिल्मचे ट्रेलर युट्युबवर इथे आहे: https://www.youtube.com/watch?v=_jLR3KaATUM ऑस्ट्रलियन फिल्म मेकरच्या वेबसाईट वरील श्री प्रल्हाद जानी यांच्यावरील पेज: http://www.lightdocumentary.com/prahlad-jani.html बीबीसीचे न्यूज कव्हरेज: http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/3236118.stm टेलिग्राफ चे न्यूज कव्हरेज: http://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/7645857/Man-claims-to-have-had-no-food-or-drink-for-70-years.html सीएनएन मधील बातमी: http://edition.cnn.com/2003/WORLD/asiapcf/south/11/26/offbeat.india.fast/ (संकलन:- श्री. निलेश देशमुख, पनवेल, रायगड)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *