शब्द जवळचे वाटतात

अंतरंगी भावनांची किती वादळे उठतात, कुणीच नसतं आपलं तेव्हा शब्द जवळचे वाटतात | द्वंद्व पेटता मनाचे वाटे आपणच आपल्याशी भांडावे, भाव सारे अंतरातले कवितेमधून मांडावे | पाणवठ्यावर आयुष्याच्या किती माणसे भेटतात, कुणीच नसते आपले तेव्हा शब्द जवळचे वाटतात | वाटत असतं कुणाला तरी मनातलं सारं सांगावं, मानूनही त्यास आपलं रंगात त्याच्या रंगावं | हळव्या या मनामध्ये किती आठवणी दाटतात, कुणीच नसतं आपलं तेव्हा शब्द जवळचे वाटतात | तोडून द्यावे वाटते आता बंधनांचे कुंपण, शब्दफुलांमधून व्हावी कवितेची गुंफण | स्वप्नांच्याही वेलीवरती अंकुर नवे फुटतात, कुणीच नसतं आपलं तेव्हा शब्द जवळचे वाटतात | कवयित्री:- कु. प्रांजला मयुरेश धडफळे, पुणे. संपर्क:- ९६७३१६७०९९]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *