सनातनवर बंदी घालण्याआधी इस्लामवर बंदी घालणार का? भागवताचार्य

सनातनवर ऊठसूट बंदीची मागणी करणारे याचे उत्तर देतील का ? पंढरपूर – आज इस्लामच्या नावाखाली जगात प्रचंड नरसंहार चालू आहे. आपल्या देशात प्रतिदिन बॉम्बस्फोट होत आहेत. शेकडो माणसे मरत आहेत. इस्लामच्या नावाखाली पाकिस्तानमध्ये, बांगलादेशामध्ये सहस्रावधी हिंदू मरत आहेत, बाटवले जात आहेत. मंदिरे-मूर्ती उद्ध्वस्त होत आहेत. आपल्या देशाला इस्लामी आतंकवाद्यांनी घेरले आहे. हा आतंकवाद थांबवायचा असेल, तर इस्लामवर बंदी घालणार का ? ते योग्य होईल का ?, असा परखड प्रश्न भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी उपस्थित केला. भागवताचार्य उत्पात पुढे म्हणाले, १. दाभोलकर, पानसरे खून खटल्यातील संशयित आरोपी सनातन संस्थेचे साधक आहेत; म्हणून सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, म्हणजे गांधीवधातील आरोपी संघ स्वयंसेवक होते; म्हणून संघावर बंदी घातली होती, त्यासारखे अविचाराचे होईल. २. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसच्या गुंडांनी शिखांची घरे जाळली. गांधी वधानंतर काँग्रेसच्या गुंडांनी ब्राह्मणांची घरे जाळली, तेव्हा काँग्रेसवर बंदी घातली का ? इंदिरा गांधी यांची हत्या एका शिखाने केली; म्हणून शीख धर्मावर बंदी घातली का ? ३. दाभोलकर, पानसरे यांची हत्या सनातनच्या साधकाने केली कि नाही ? केली असल्यास त्यात सनातन संस्थेचा संबंध आहे का ? हे न्यायालयात अजून सिद्ध व्हायचे आहे. त्याआधी सनातनवर बंदी घालणे योग्य आणि वैध आहे का ? ( दै. सनातन प्रभात साभार )]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *