मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अशी धमकी देऊन हिंदुद्वेषी तृप्ती देसाई यांनी स्वतःची बौद्धिक दिवाळखोरीच उघड केली आहे ! धर्माचा काडीचाही अभ्यास नसणार्यांनी धार्मिक क्षत्रात लुडबूड करणे, हे हास्यास्पद होय ! कोल्हापूर: श्री महालक्ष्मी मंदिरात तोकडे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय म्हणजे घटनेवर घाला घालण्याचा प्रकार आहे. (मंदिर आणि घटना या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्याने घटनेवर घाला घालण्याचा प्रश्नच येत नाही. उलट मारहाणीची धमकी देऊन तृप्ती देसाई कायदा हातात घेऊ पहात घटनेचा अवमान करत आहेत !) येत्या १० ऑक्टोबरपर्यंत निर्णय मागे घ्यावा अन्यथा भूमाता ब्रिगेडच्या महिला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांना चोप देतील, अशी चेतावणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी २ ऑक्टोबरला येथे दिली. (श्री महालक्ष्मी मंदिरात तोकडे कपडे घालून न येण्याचा देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. धर्मशास्त्राचा, तसेच रूढी, चालीरिती, परंपरा यांचा अभ्यास नसतांना तृप्ती देसाई यांच्याकडून अशी विधाने करून वारंवार प्रसिद्धीसाठी स्टंट केला जात आहे. यापूर्वी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात शिरतांना तृप्ती देसाई यांना कोल्हापूरकरांनी चोप देऊन बाहेर काढले होते !) नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने तोकडे कपडे घालून आलेल्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय २ दिवसांपूर्वी घेतला होता. पश्चिम महाराष्ट्रातील ३ सहस्रांहून अधिक मंदिरांत हा निर्णय लागू करण्यात आल्याचेही सांगितले होते. ड्रेस कोडविषयी केवळ आवाहन सक्ती नाही ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ‘ड्रेस’कोडविषयी भाविकांना आवाहन केले आहे. ही सक्ती नाही कि असा कोणताही फतवा काढण्यात आलेल नाही. पद्मनाभम् मंदिर, बालाजी मंदिर, तसेच अनेक मंदिरांमध्ये भाविकांचे कपडे कसे असावेत, याविषयी नियम आहेत. तशाच प्रकारे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करतांना ‘ड्रेस’कोडविषयी आम्ही भाविक, भक्तांना आवाहन केले आहे. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक भाविकांनी लेखी, तसेच तोंडी आमच्याकडे केली होती. देवस्थान समितीमध्ये असलेल्या महिला सदस्यांचेही तसे मत होते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे मत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे श्री. महेश जाधव यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. श्री. महेश जाधव म्हणाले, ‘‘एखाद्या भाविकांनी ड्रेसकोड सोडून वस्त्र परिधान केले असेल, तर आम्ही त्यांना ते पालटण्यासाठी खोली उपलब्ध करून देऊ; मात्र यानंतरही जर भाविक आहे त्या कपड्यातच दर्शन घेणार म्हणाले, तर आम्ही त्यांना अडवणार नाही. नवरात्र तोंडावर असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी अकारण या प्रश्नावर कुणी वाद उत्पन्न करू नये. या संदर्भात आम्ही कुणाशीही चर्चा करण्यास सिद्ध आहोत.’]]>