सोलापूर(ता. माळशिरस): गावखेड्यांतील ग्रामिण रस्त्यांच्या निर्माणासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या विविध योजना अस्तित्वात आहेत, पंरतु स्वातंञ्यानंतर आजपर्यंत ग्रामीण भागात पक्के रस्ते नाहीत . जे असतील त्याही रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही. असाच एक रस्ता नेवरे -से.१४-श्रीपूर हा ९ किमीचा आहे . रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असून, वाहन धारकांना जीव मूठीत धरून या रस्त्यावरुन वाहतूक करावी लागते. तसेच अशा प्रवासामुळे नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाठीच्या मणक्याचे आजार झाले आहेत. प्रतीबंधात्मक उपाय म्हणून लोक, गरोदर महिला यांना तर प्रसूतिसाठी काही दिवस अगोदरच दवाखान्यात दाखल केले जात आहे.कारण रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे लोक त्रस्त झाले आहेत. बांधकाम विभागाने सतत नेवरे सेक्टर १४ या गावातील लोकांवर एक प्रकारे अन्यायच केला आहे. त्यामुळे प्रशासन आणि राजकीय पूढारी यांच्या कृपा अशिर्वादाने नेवरे-सेक्टर १४-श्रीपूर रस्त्याची दयनिय अवस्था झाल्याचे पहावयास मिळत आहे, असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. सविस्तर वृत असे की नेवरे -सेक्टर १४-श्रीपूर रस्त्याची नियामाप्रमाणे दर तीन वर्षांनी देखभाल दूरूस्ती करणे गरजेचे आहे . प्रशासन या रस्त्याची डागडुजी करून नुसता देखावा करत आहे. यामुळे या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे या रस्त्यावरून नेवरे, कोंढरपट्टा (शिवनगर), उंबरे(वे), तसेच पंढरपूर तालुक्यातील लोक या रस्त्यावरून प्रवास करतात. तसेच या रस्त्यावरून चार-पाच सहकारी /खाजगी साखर कारखान्यांची ऊस वाहतूक केली जाते. ट्रकर चालक जीव धोक्यात घालून ऊसाची वाहतूक करतात. उन्हाळ्यात रस्ते दुरूस्त करणे अपेक्षित होते. तरी कारखाने चालू (सुरू) करण्याची वेळ झाली आहे, तरी रस्ते दुरूस्त केलेले नाहीत. त्यामूळे प्रशासन आणि कारखाने मालक हे नागरिक, चालक यांचे जीव धोक्यात घालत आहे. तसेच नेवरे गावातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी वर्ग एसटी च्या अनियमित वेळेमुळे खाजगी वाहनाने दररोज ये-जा करत असतात. त्यांना या खराब रस्त्याचा सामना करावा लागत असून आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: रस्त्यावर अगदी दोन तीन फूटावर एक/दोन फूट खोल भले मोठे खड्डे, लहान मोठे दगड गोटे रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडांचा विळखा असल्यामुळे काठेरी झाडा -झूडपामध्ये पाच-सहा फूटाचा रस्ता शिल्लक राहिला आहे .त्यामूळे संबंधित विभागाने लवकरात लवकर नेवरे -से१४-श्रीपूर रस्ता दूरूस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. श्रीकृष्ण देशपांडे प्रतिनिधी, सोलापूर]]>