याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, मोटार वाहन कायदा कलम ६ अंतर्गत जारी केलेले योग्यता प्रमाणपत्र वैध असले, तरीही स्कूल बसची तपासणी करणे बंधनकारक आहे. ही तपासणी पंढरपूर, बार्शी, मोहेाळ, अक्कलकोट आणि मंगळवेढा येथील शिबिराच्या ठिकाणी करण्यात येईल. उर्वरित वाहनांची तपासणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे निशुल्क करण्यात येईल. तपासणी न करुन घेण्याच्या स्कूल बस, परमिट धारकावर कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.
शिबीर कार्यालयाच्या तारखा
अकलूज उपप्रादेशिक कार्याल्याच्या क्षेत्रातील सांगोला येथे ६ आणि २९ मे रोजी शिबीर कार्यालया आयेाजित करण्यात आले आहे. टेभुर्णी येथे ८, २३ मे, करमाळा येथे १०, २४ मे माढा येथे १४ मे आणि कुर्डुवाडी येथे १६ मे रोजी शिबीर होईल. ही सर्व शिबीरे त्या त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहात होईल.
शालेय वाहतुक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून घेण्याचे आवाहन
सोलापूर, (श्रीकृष्ण देशपांडे):– शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहिम उपप्रादेशीक परिवहन कार्यालयामार्फत राबवली जाणार आहे. तरी सर्व शाळा आणि शाळेव्यतिरिक्त कंत्राटी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि इतर वाहनांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी कायालयाकडून करण्यात आले आहे.