पंढरपूर, दि. 4 – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील बाळसमुद्र या छोट्याशा गावातील मेरत कुटुंबाला यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. परसराव उत्तमराव मेरत ( वय ४२) व त्यांच्या सुविद्य पत्नी अनुसया (वय ४२) अशी या भाग्यवंत दांपत्य वारकऱ्यांची नाव आहेत. व्यवसायाने शेतकरी असलेले गरीब घरातील मेरत दाम्पत्य गेल्या दहा वर्षापासून ते वारी करतात तर गेल्या तीन वर्षापासून ते वारीत माऊलींच्या पालखीसह पायी सहभागी होत आहेत. त्यांची ३ एकर जिरायत शेती असून, दोन मुली व दोन मुली आहेत. मुलींची लग्ने झाली आहेत. एक मुलगा शेती करतो तर एक शिकत आहे. आमचे पूर्व जन्माचे कांही भाग्य असेल म्हणून हा मोठा मान आम्हाला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.]]>
Related Posts

‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतर करा ! हिंदु संघटनांची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी:- कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा अपूर्ण व एकेरी उल्लेख असल्याने अनेक वर्षांपासून शिवभक्त…