चंदगड, कोल्हापूर: दिनांक ३० ऑक्टोबर रोजी मानवाधिकार संरक्षण समितीची बैठक हलकर्णी -चंदगड, येथील अजिंक्यतारा हॉटेलच्या सभागृहात संदिप शांताराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अरुण पाटील व बेळगांवचे श्री. रवी पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. चंदगड येथील युवा सामाजिक कार्यकर्ते संदिप पाटील यांनी श्री. अरूण पाटील व श्री. रवी पाटील यांचे शाल, श्रीफळ व पुष्प देवून स्वागत केले . अरूण पाटील यांनी मानवाधिकार संरक्षण समितीची संकल्पना स्पष्ट करून ध्येय व उद्दिष्टये सांगून संघटनेच्या माध्यमातून अन्यायाला कशी वाचा फोडायची व कोणते उपक्रम राबवावेत ते सांगितले. तसेच चंदगड तालुका कार्यकारिणी निवडीबाबत मार्गदर्शन केले. मानवाधिकार म्हणजे व्यक्ती , समुह वा समाजावर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाला न्याय मिळून देणे असून, तालुक्यातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवून ही संघटना सामाजिक कार्यास बांधिल असेल. अशा प्रकारचे कार्य करण्यास मदत होईल. असे विचार श्री. रवी पाटील यांनी मांडले . आपल्या तालुक्यात अनेक समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी आणि समाजिक बांधिलकी जपण्यासाठी व विविध उपक्रम हाती घेवून चंदगडवासीयांना विश्वास संपादन करण्यासाठी तालुक्यातील युवकांनी या संघटनेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन श्री. संदिप पाटील यांनी व्यक्त केले . यावेळी तालुक्यातील सुमारे शंभराहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.]]>