जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशिय सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपायुक्त प्रताप जाधव, पुरवठा शाखेच्या उपायुक्त निलीमा धायगुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, ‘चारा छावणीतील जनावरांचे लसीकरण करा. लहान जनावरांचे निर्जंतुकीकरण करा. पशुपालक समितीची स्थापना करा. टँकर भरून घेण्यासाठीचे स्त्रोत निश्चित करा. टँकरची देयके जीपीएसच्या लॉगबुक तपासूनच द्यावी. त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे तपासून घ्यावी. टँकरची क्षमता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कडून खात्री करून घ्यावी. टँकरला अजिबात गळती असू नये.
नरेगावरील कामावर मजूर येण्यासाठी नियोजन करावे. बंधाऱ्यातील गाळ काढण्याची कामे घ्यावीत. टँकर भरण्यासाठीच्या स्त्रोतांच्या परिसरातील वीज पुरवठ्याचे नियमन करताना उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा केली जावी, अशाही सूचना डॉ. म्हैसेकर यांनी केल्या. यावेळी जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, जीवन प्राधिकरण, महानगरपालिका, जलसंपदा, महावितरण अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आवश्यक असेल तिथे २४ तासांत टँकर : डॉ. भोसले
पाणी टंचाईच्या गावातून मागणी आल्यास चोवीस तासात टँकर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. टँकर मागणी असलेल्या गावांना उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे भेट द्यावी. मागणीत तथ्य असल्यास तत्काळ टँकर द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.
चारा छावणीतील जनावरांना टँगिंग करुन घ्यावे :
धायगुडेछावणी चालक आणि महसूल प्रशासन यांच्या कर्मचाऱ्यांना जनावरांच्या बारकोडिंग बाबत प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना पुरवठा उपायुक्त निलीमा धायगुडे यांनी दिल्या. त्यांनी सांगितले की, दुधाळ जनावरांना ईनाम प्रणाली वर नोंदणी करुन घ्यावे. त्याच्या नोंदी ठेवा. प्रत्येक छावणीत पशुपालक समितीची स्थापना करावी. या समितीची बैठक दर आठवड्याला बैठक घ्यावी. श्रीमती धायगुडे पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील चारा छावण्यांच्या संचलनासाठी समन्वय अधिकारी आहेत.
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनाजनावरांचे लसीकरण करापशुपालक समिती स्थापन कराटँकरची क्षमता तपासून घ्याटँकरला गळती असू नये
]]>