श्रीकृष्ण देशपांड / ता. खटाव (जि. सातारा) येथील श्रीमती सिंधु शिवाजी रोकड़े यांच्या घरात बॉब सदृष्य वस्तु आढळून आली. चिंचवड़ पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं.३०८/२०१६ भारतीय स्फोटक कायदा कलम २००५ प्रमाणे चिंचवड़ पोलिस स्टेशनला आज दि २४/१२/२०१६ रोजी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुह्यामधील संशयित स्पोटकामधील किंवा बॉब सदृश्य वस्तु पैकी दोन वस्तु चिंचवड़ येथे सापडल्या. एक वस्तु पुसेगाव पोलिस ठाणे हद्दीतील खटाव येथे श्रीमती सिंधु शिवाजी रोकड़े यांच्या राहत्या घरी असल्याची माहिती पुसेगाव पोलिस स्टेशनला मिळाली होती. संबधित संशयित वस्तुच्या अनुषंगाने डीवायएसपी प्रेरणा कट्टे, एपीआय सावन्त्रे, पीएसआय वाघ, पोलिस हवलदार चव्हाण, पोलिस हवलदार गायकवाड़, पोलिस नाईक कुंभार यांनी संबधित व्यक्तीच्या घरी तपासणी केली असता संशयीत वस्तु आढळून आली. तिचा बॉब शोधक पथका मार्फत खात्री केली असता तो स्फोटकजन्य पदार्थ असल्याचे सकृती दर्शनी डीडीडीएस पथकाने कळविले. वरुन तिचा दोन पंचासमक्ष पंचनामा करुन पुसेगाव पोलिस स्टेशन व डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांनी ताब्यात घेऊन संबंधित गुन्ह्यातील पुढील कारवाई साठी चिंचवड पोलिस स्टेशनला पाठविण्याची तजवीज केली आहे. अशी माहिती पुसेगाव पोलिस स्टेशनचे एपीआय सावन्त्रे यानी दिली. पिंपरी चिंचवड मध्ये सापडलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तू प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटक वस्तू माजी सैनिक जवानाकडून आल्याचं आणि तो जवान कुटुंबातीलच एक व्यक्ती असल्याची माहिती विश्वनाथ साळुंखेने पोलिसांना दिली आहे. ज्या महिलेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी विश्वनाथने दिली, त्याच महिलेनं ही धक्कादायक माहिती एबीपी माझाला दिली आहे. विश्वनाथ वेळोवेळी ब्लॅकमेल करून त्या महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत असे. बळजबरीन ही महिला तिथं राहिली खरी, पण तीनं यातील एक बॉम्ब पुराव्यासाठी काही दिवसांपूर्वी तिच्या नातेवाईकांकडे पाठवून दिले होते. काल ही घटना समोर आल्यावर महिलेच्या साताऱ्यातील खटाव गावातून स्थानिक पोलीस तो बॉम्ब घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये जाणार आहेत.]]>