विराट कोहलीच्या दमदार शतकाने भारताची मालिकेत बरोबरी

चेन्नई : दक्षिण आफ्रिकेबरोबर चालु असलेल्या गांधी मंडेला फ्रीडम सिरीजमध्ये चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर आफ्रिकेवर ३५ धावांनी मात करीत ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत २३वे तर दक्षिण आफ्रिकेबरोबर पहिले शतक करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. १-२ अश्या पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला चौथ्या सामन्यात विजय आवश्यक होता. कर्णधार महेंद्र सिंघ धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली पण मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला. संपूर्ण मालिकेत फेल ठरलेला शिखर धवन आजही काही खास करू शकला नाही. तो केवळ ७ धावा करीत तंबूत परतला. सलामीवीर लवकर परतल्यानंतर कोहली आणि अजिंक्य राहणे यांनी संयमी फलंदाजी करीत भारताचा धावफलक चालू ठेवला. विश्वचषक सामन्यात पाकिस्तान विरुद्ध फेब्रुवारी मध्ये ठोकलेल्या शतकानंतर कोहलीला एकही शतक करण्यात यश आलं नाही. आज त्याने अतिशय संयमी आणि शिस्तप्रिय फलंदाजी करीत शतक ठोकल. राहणेही त्याला उत्तम साथ दिली. फॉर्म मध्ये नसलेल्या सुरेश रेनालाही आज सूर गवसला आणि एक अर्धशतक झाकवल. भारताने आपल्या निर्धारित ५० षटकांत ८ बाद २९९ धावा झळकावल्या. प्रतिउत्तरादाखल दक्षिण आफ्रिका संघाने सुरुवात चांगली केली पण हशिम अमला केवळ ७ धावा करीत तंबूत परतला. त्यानंतर डी कॉकही ४३ धावा करीत बाद झाला. कर्णधार डी विलियर्सने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत आक्रमक पण संयमी फलंदाजी केली. त्याने आपल्या कारकिर्दीतील २२ वे शतक लगावले. इतर फलंदाजांची त्याला साथ न मिळाल्यामुळे धावांचा पाठलाग करण्यात ते अपयशी ठरले. भारतातर्फे कुमारने ३, हरभजन सिंघने २ तर मोहित शर्मा, अक्षर पटेल, अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक गाडी बाद केला. मालिकेतील शेवटचा सामना रविवारी मुंबई येथील वानखेडे येथे होईल.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *