नागपूर(श्रीकृष्ण देशपांडे) दि. १७, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी खासदार, आमदार आणि नगरसेवकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद सदस्यांनाही पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार असून त्यांना सहा वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनात तसे विधेयकच विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.]]>