अमरावती जिल्ह्यातील विज समस्यांबाबत गहण चर्चा. नागपुर :- महाराष्ट्राचे उर्जामंत्री नाम. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवार दिनाक १० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता नागपुर येथील ऊर्जा भवन येथे अमरावती जिल्ह्यातील विज वितरण समस्या बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विजेच्या समस्यांवर गहन चर्चा करण्यात आल्यानंतर उर्जामंत्री बावनकुळे यांनी अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यातील विजेच्या समस्या तसेच विज ट्राँन्सफार्मर बसविण्याबाबत वेळीच प्राधान्य देऊन काम त्वरित करण्याचे आदेश ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी बैठकीला अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रवीणजी पोटे पाटील, अमरावती विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ. सुनीलजी देशमुख, मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ. अनिलजी बोंडे, अचलपुर विधानसभा मतदार संघाचे आ. ओमप्रकाश उर्फ़ बच्चू कडू, दर्यापुर विधानसभा मतदार संघाचे आ. रमेशजी बुंदले, नाशिकच्या आमदार सौ. देवयाणी फरांदे सह आदि आमदार व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (वृत्त विशेष – संदीप बाजड) नागपुर हिवाळी अधिवेशन, नागपुर.]]>