वार्धक्याच्या वळणावर…

किती भाबडी स्वप्ने होती बाळा माझ्या डोळ्यात, पण क्षणभंगूर या स्वप्नांना बाळा मीच चुकले कवेत घेण्यात ।। तुला पाठवला परदेशी मोठा साहेब होण्यासाठी, माहित नव्हतं सोडशिल मला माझ्या जीर्ण झालेल्या आयुष्यासाठी ।। गेला आहेस सोडून आता घे भरारी आकाशी, माझी काळजी नकोच, मी एकसंग होईल हवेशी ।। ‘पैसा’ बाळा म्हणशील तर मी आजही राब राब राबून कमावती आहे, तु जवळपास नसलास तरीही मी माझं आईपण आजमवती आहे ।। निष्पर्ण हे झाड अशक्त आज वादळात डगमगत आहे, तुला सावरताना दृढ हे झाड तुझ्याविना आज डळमळत आहे ।। रमला आहेस बाळा तु तुझ्या बायकां मुलात, तुला जपण्यात तेव्हा मोडला कणा त्यांचा संसारात ।। माझी नाही आली आठवण निदान त्यांच तरी कर स्मरण, विसरु नकोस त्यांचं त्यानी तुझ्यासाठी अर्पीलेलं मरण ।। तुला पोसत असताना, जगण्यास कैकदा मिळाले फाटे, कित्येकदा उषःकाल झाला तिमीर अन् बोचत राहिले काटे ।। आता नाही सहन होत हा एकांत, दु:ख अन् ह्या वेदना, मरणासन्न या अवस्थेत येरे दावण्या संवेदना ।। भासाच्या या दुनियेत माझ्या किती अस्ताव्यस्त होऊ मी, जीवंतपणीच अशा मरण यातना कधी पर्यंत पाहू मी ।। मरणाच्या उंबरठ्यावर अलगदपणे सरते आहे, दुर्भागी ही तुझी आई मृत्यूची कवाड उगडती आहे ।। असेल पुन्हा जन्मच तर पुन्हा पुत्र बनून ये माझ्या पोटी, तेव्हातरी भरशील का सोन्या, माझ्या मातृत्वाची ओटी ।। माझ्या मातृत्वाची ओटी ।। कवी:- शिवसुत सुजित खोत कोल्हापुर]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *