बदलापूर: रविवार दिनांक २६ फेब्रूवारी २०१७ रोजी कोल्हापूर उत्कर्ष सेवा मंडळ, बदलापूर या मंडळाच्या तृतिय वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी प्रश्न मंजुशा व हळदी कुंकू व ७ वी आणि १० वी मध्ये ऊत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर ६ वाजता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. दीपक पवार साहेब यांनी उपस्थित पालक व विध्यार्थ्यांना मार्गदशन केले. तसेच बेळगाव सीमावासींच्या पाठीशी रहाण्याचे अवाहन त्यांनी उपस्थित कोल्हापूरकरांना केले. कार्यक्रामाच्या प्रारंभी देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. सांयकाळी ७ वाजता बालशाहीर हेरंब पायगुडे आणि त्यांच्या सहकलाकारांनी पोवाडा सादर करून उपस्थित प्रेक्षकांपुढे शिवचरित्रच उभे केले. बालशाहीर हेरंब पायगुडे हा बालशाहीर जेव्हा डोक्यावर मर्दानी फेटा बांधून आणि डफावर दणकेबाज थाफ मारून आपल्या फर्ड्या आवाजात शिव पोवाडा सादर करत होता, तेव्हा उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर साक्षात छत्रपती शिवराय, धर्मवीर श्री संभाजी महाराज, मर्द मावळे आणि त्यांचे संपूर्ण स्वराज्य उभे राहीले होते. [gallery link="file" columns="4" ids="2676,2677,2678,2679"] या ऎतिहासीक कार्यक्रमाला स्थानिक आमदार श्री.किसन कथोरे, नगर सेवक श्री.राजेंद्र घोरपडे, श्री.अशीष दामले, श्रीधर पाटील, श्री.संभाजी शिंदे, श्री.अविनाश भोपी, श्री.रविंद्र गाडगे, श्री.संजय गायकवाड, तसेच शहरातील प्रसिद्ध समाज सेवक, उद्योजक, विविध मंडळाचे कार्यकर्ते, पत्रकार, मंडळाचे अध्यक्ष श्री. जयवंत दळवी, कार्याध्यक्ष श्री. शंकर पवार, उपाध्यक्ष श्री. जोतिबा पाटील, श्री. गजानन साळूंखे तसेच संपर्क प्रमुख तसेच महिला संघटक, पदाधिकारी व हजारो कोल्हापूरकर उपस्थित होते. या कार्यक्रामाचे सुत्रसंचालन श्री. नामदेव धोनकुटे सर यांनी केले व श्री. संदिप गावडे यांनी आभार मानले. जय महाराष्ट्र। (वृत्त संकलन:- श्री. गजाननराव साळूंखे, युवा सह्याद्री, बदलापुर)]]>