नवी मुंबई:- शाळेमध्ये शिक्षण घेणार्या गोरगरीब विद्यार्थ्यांना जेवणाऐवजी चिक्की देण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिका सभागृहात संमत केला आहे. त्यामुळे महासभेला येणार्या नगरसेवकांकरीता प्रशासन जे जेवण देते, ते जेवण न देता त्यांना विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पौष्टिक चिक्की देण्याची उपहासात्मक मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी चे सचिव विरेंद्र (गुरू) म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
पालिकेतील सत्ताधारी पक्षाने शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण नाकारून त्याऐवजी पौष्टिक चिक्की देण्याचा अजबगजब निर्णय संमत केला आहे. त्यामुळे जेवण पौष्टिक, की चिक्की पौष्टिक असा सर्वसामान्य नवी मुंबईकरांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे महासभेला येणार्या नगरसेवकांनाही जेवण नाकारून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पौष्टिक चिक्की देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेंद्र (गुरू) म्हात्रे यांनी केली आहे.
दरम्यान नवी मुंबई काँग्रेसचे मास्टर माईंड असलेले व काँग्रेसच्या थिंक पॉलिसीचे ब्रेन असणार्या विरेंद्र ( गुरु ) म्हात्रेच्या उपहासात्मक मागणीची नवी मुंबईकरांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
]]>