सनातन संस्थेला हिंदुद्वेषातून ‘बळीचा बकरा’ बनवू नका ! – अभय वर्तक कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यास संशयित म्हणून अटक केली. या प्रकरणी पोलिसांकडून अजून चौकशी सुरू आहे; मात्र हिंदुविरोधी शक्ती, पुरोगामी मंडळी आणि राजकीय पक्ष यांनी पोलिसांची चौकशी अन् न्याययंत्रणेचे न्यायदान होण्याआधी सनातनवर बंदी घालण्याची मागणी करण्यास प्रारंभ आहे. हे त्यांचे न्याययंत्रणेवरील अविश्वास आणि राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेचे कार्य समजून न घेता, तसेच आरोपांच्या संदर्भातील संस्थेची भूमिका स्पष्ट होण्याअगोदर बंदीचा निर्णय घेणे म्हणजे सनातनवर मोठा अन्याय करणे आहे. त्यामुळे कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी. राष्ट्र्रप्रेमी सनातन संस्थेला ‘बळीचा बकरा’ न बनवता संभाव्य बंदीच्या विरोधात शासनाच्या वतीने ठोस भूमिका घेण्यात यावी, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी या वेळी केली. हिंदुमहासभाच्या वतीने अधिवक्ता जयेशजी तिखे यांनी आपले परखड मत प्रदर्शित केले. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथून निघालेल्या भव्य निषेध मोर्चाला ते संबोधित करत होते. या वेळी शिवसेना, हिंदु गोवंश रक्षा समिती, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, श्री योग वेदांत समिती, श्री संप्रदाय, अखिल भारतीय हिंदु महासभा, हिंदु युवा मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, हिंदु चेतना मंडळ, हिंदु राष्ट्र सेना, जयहिंद सेवा समिती, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वराज्य हिंदु सेना, हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती (चेंबूर), शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान, शिवकार्य प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. तसेच या वेळी सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव, पू. स्वाती खाड्ये आणि पू. अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. [gallery columns="4" link="file" ids="570,571,572,573,574,575,576,577,578,579,580,581"] या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या… १. यापूर्वी रा.स्व.संघाने कोणताही आरोप सिद्ध झालेला नसतांना केवळ हिंदुद्वेषातून बंदीचा त्रास भोगला आहे. तोच प्रकार सध्या सनातन संस्थेविषयी होत असून केवळ पुरोगाम्यांच्या दबावापोटी शासनाने सनातनवर बंदी घालू नये. २. सनातन संस्थेवर लक्ष केंद्रित करण्याची काही व्यक्ती आणि संघटना यांची प्रवृत्ती अत्यंत संशयास्पद वाटते. त्यातून अशा व्यक्ती आणि संघटना यांवर आर्थिक घोटाळ्यांचे आरोप असल्यामुळे काही सत्य निष्कर्षांपर्यंत तपासयंत्रणा पोहोचू नयेत, या धडपडीतून सनातनला लक्ष्य केले जात आहे का ?, याच्या चौकशीचे आदेश आपण द्यावेत. डॉ. उदय धुरी, समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने (संपर्क : ०८४५०९५०५०२)]]>