ठाणे येथे नथुराम गोडसे बलीदान दिन साजरा ठाणे, १६ नोव्हेंबर – प्रत्येक हिंदूने राष्ट्र्र आणि धर्माभिमान जपलाच पाहिजे. अखंड हिंदु राष्ट्र करण्यासाठी हिंदु राजसत्ता मिळवणे, हा हिंदूंचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हुतात्मा नथुराम गोडसे यांनी देशाची एकात्मता आणि अखंडता टिकून रहावी; म्हणून निदर्शने, मोर्चा, निवेदने, उपोषणे हे पर्याय निवडून ते कृतीशील झाले; पण त्यांचा काहीच परिणाम न झाल्याने त्यांनी गांधी यांची हत्या केली. पंडित नथुरामजी गोडसे यांनी गांधीवध का केला, या मागची त्यांची भूमिका आणि भावना यांविषयीचे सत्य जगासमोर यायलाच हवे. या हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देणे, त्यासाठी बलिदान दिन आपण साजरा केलाच पाहिजे. हिंदु समाजातील गांधीवाद नष्ट करून सावरकरवाद अर्थात हिंदुत्ववाद रुजवला, तरच अखंड भारत निर्माण होईल, असे प्रतिपादन हिंदु महासभा महाराष्ट्र युवा प्रभारी श्री. राकेश हिंदुस्थानी यांनी केले. येथील श्रीशिवमंदिराच्या पटागंणात १५ नोव्हेंबर या दिवशी हिंदु महासभेच्या वतीने हुतात्मा नथुराम गोडसे बलिदान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. हिंदुस्थानी पुढे म्हणाले… १. देशात देव, धर्म, संत आणि महापुरुष यांची विटबंना, धर्मांतर, लव्ह जिहाद, घुसखोरी, हिंदु कार्यकर्त्यांची हत्या, साध्वी प्रज्ञा सिंह आणि धनंजय देसाई यांसारख्या हिंदुत्वनिष्ठांना झालेला कारावास अशा अनेक समस्यांनी देशात अस्थिरता आली आहे. त्यांचे उच्चाटन करण्यासाठी आपण प्रत्येकानेच धर्मशिक्षण घेऊन राष्ट्र आणि धर्म रक्षण केलेच पाहिजे. २. आज गोडसे-आपटे यांच्या बलिदान दिनास प्रशासनाने अनुमती नाकारली असूनही आपण हा कार्यक्रम करत आहोत, हाच खरा या देशभक्त हुतात्म्यांचा सन्मान आहे. आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत नथुराम गोडसे प्रतिमा पूजन आणि त्यांच्या अंतिम इच्छापत्राचे सामूहिक वाचन होत आहे म्हणजे अखंड हिंदु राष्ट्राची पहाट होण्याचेच हे संकेत आहेत. ३. राणाप्रताप, श्रीशिवप्रभु, गुरुगोंविद सिंह यांच्या स्वप्नातील अखंड हिंदु राष्ट्र निर्मितीसाठीच हुतात्मा पंडित नथुराम गोडसे आणि आपटे यांनी बलिदान दिले आहे. हुतात्मा नथुराम गोडसे यांच्या अंतिम इच्छापत्राचे वाचन हिंदु महासभेचे ठाणे युवा प्रभारी श्री. मनोज सुर्वे यांनी केले. या कार्यक्रमात शिवसेना-युवासेनेचे कमलेश जोशी, हिंदु सेनेचे संतोष यादव, विहिंप-बजरंग दलचे अमित मिश्रा तथा राजेश मूर्ती, अरुण केणी, राम मसुरकर, राजू राणे इत्यादी हिंदु महासभा ठाणे युवा सदस्यांची उपस्थिती होती. साभार : सनातन प्रभात]]>