चेन्नईयीन एफसीचा केरळा सामना करताना वातावरणात तणाव

कोची, दिनांक 11 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लीग स्पर्धेत “सदर्न डर्बी’ असलेली केरळा ब्लास्टर्स आणि चेन्नईयीन एफसी यांच्यातील सामना नेहमीच तीव्र चुरशीचा असतो आणि यावेळी कोचीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या दहाव्या फेरीतील लढतीतही त्यात बदल होण्याची शक्‍यता नाही. स्पर्धेच्या पहिल्या वर्षी केरळा ब्लास्टर्सने चेन्नईयीन एफसीला उपांत्य फेरीत बाहेर टाकले, तेव्हापासून दोन्ही संघांमधील कडवटपणा वाढलेला आहे आणि तो यावर्षी चेन्नईत या दोन्ही संघातील लढतीतील ताणतणावानंतर पुन्हा प्रज्वलित झालेला आहे. त्या लढतीतील प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या गैरवर्तणुकीनंतर प्रशिक्षक मार्को मॅटेराझी यांना निलंबित करण्यात आले होते आणि उद्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरील वातावरणही गरमागरमच असेल. “”माझ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यांसाठी संदेश समान असतो. 10 विरुद्ध 11 असे खेळणे ही चांगली संकल्पना नाही आहे. शिस्त ही अतिशय महत्त्वाची आहे. मला वाटतं की मागील सामन्यात काहीतरी गैरसमज होता,” असे केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक स्टीव कोपेल यांनी त्या बरोबरीच्या लढतीनंतर मॅटेराझी यांचा त्यांच्या एका खेळाडूबरोबरच्या संघर्षाविषयी सांगितले. केरळा ब्लास्टर्सने एफसी गोवाविरुद्धच्या घरच्या मैदानावरील मागील लढतीत महत्त्वपूर्ण विजय मिळविण्यात यश मिळविले होते आणि उपांत्य फेरीतील जागेचा पाठपुरावा करताना आरामास वेळ नाही असे कोपेल यांना वाटते. “”प्रत्येक सामना नवे आव्हान असते. स्पर्धेकडे पाहताना प्रत्येक सामन्यागणिक धक्कादायक निकाल लागत आहेत. साखळीतील कोणताही संघ दुसऱ्या संघाला पराभूत करण्याइतपत सक्षम आहे यात संशयच नाही. त्यामुळे तुम्ही निश्‍चिंत राहू शकत नाहीत. तुम्हाला तयारीत आघाडीवर राहावेच लागले,” असे कोपेल म्हणाले. चेन्नईयीन एफसीविरुद्ध विजय नोंदविण्यासाठी त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावीच लागेल, कारण दाक्षिणात्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ते कधीच जिंकलेले नाहीत. ते चेन्नईयीन एफसीविरुद्ध पाच सामने खेळले आहेत आणि तीन सामने गमावले असून अन्य दोन सामने बरोबरीत राहिले आहेत. मागील लढतीत दिल्ली डायनॅमोजविरुद्ध 1-4 असा मनोधैर्य कमी करणारा पराभव पत्करल्यानंतर, स्पर्धेतील मोहीम पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी चेन्नईयीन एफसीलाही सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल. चेन्नईयीन एफसीचे प्रशिक्षक मार्को मॅटेराझी यांनी सरासरी प्रत्येक सामन्यात अंदाजे चार बदल केलेले आहेत (आतापर्यंत 8 सामन्यांत 30 बदल) आणि यावरून स्पष्ट होतेय की चौघांचा अपवाद वगळता संघात स्थैर्य नाही. “”फुटबॉल हा सुंदर खेळ आहे. या लढतीनंतर तुम्हाला आणखी एक संधी असेल. एका सामन्यानंतर तुम्हाला पुढील लढतीवर लक्ष एकटवावे लागते,” असे मॅटेराझी म्हणाले. मॅटेराझी चेन्नईयीन एफसी सोबत 2014 मध्ये स्पर्धा सुरू झाल्यापासून आहेत आणि त्यांना दोन्ही संघांतील वैराबाबत पक्की माहिती आहे. केरळा ब्लास्टर्सला घरच्या मैदानावर मिळणाऱ्या उत्स्फूर्त पाठिंब्याविषयी ते ज्ञात आहेत, त्यामुळे उद्या सुंदर खेळ होईल असे ते ठासून सांगत आहेत. चेन्नईयीन एफसीचे आठ सामन्यांतून 10 गुण झाले आहेत आणि ते सातव्या क्रमांकावर एफसी गोवापेक्षा वर आहेत, ज्यांना त्यांनी गतमोसमात विजेतेपद मिळविताना नमविले होते.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *