टाटा कन्सल्टन्सी, शिर्डी संस्थान तयार करणार हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम

नाशिक – राज्यातील हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंगचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास योजनेमधून टाटा कन्सल्टन्सी व शिर्डी संस्थानतर्फे ‘फिनिशिंग स्कूल’सारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश कौशल्य विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासंबंधी मंत्रालयात डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. आमदार जयवंत जाधव, शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, कौशल्य विकासचे आयुक्त ई. रवींद्रन, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणचे संचालक अनिल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शैलेश कुटे, संजय खैरनार आदी उपस्थित होते. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग पदविका घेतल्यावर तुटपुंज्या ज्ञानामुळे तरुणांना चांगल्या हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळत नाही, असे आमदार जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *