स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानप्रकरणी एबीपी माझा कडून बिनशर्त माफी आणि संबंधित कार्यक्रम काढून टाकण्याचे आश्वासन

मुंबई:- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि झालं त्या प्रकरणी स्पष्ट माफी मागून संबंधित कार्यक्रमांच्या चित्रफिती सर्व माध्यमांतून काढून टाकण्याचे आश्वासन `एबीपी’ वृत्त वाहिनीतर्फे देण्यात आले आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या दिनी २८ मे २०१९ रोजी `एबीपी’ वृत्तवाहिनीने स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एका चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून सावरकरांची नाहक बदनामी केली होती.  त्यानंतर उसळलेल्या जनक्षोभाची दखल घेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने एका शिष्टमंडळाने एबीपी वाहिनीकडे निषेधाचे निवेदन दिले. त्यावेळी वृत्तवाहिनीतर्फे तुळशीदास भोईटे यांनी निवेदन स्वीकारत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.या शिष्टमंडळात स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, भाजपा खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, नगरसेवक सुनील यादव,  श्वेता परुळकर, (प्रवक्त्या, भाजपा), विष्णू काळडोके (प्रवक्ते, डबेवाला असोसिएशन), विश्वाजित शिंदे व अशोक कारंडे (शिवछ्त्रपती पुरस्कारविजेते आंतरराष्ट्रीय नेमबाज), सुनील पवार (शिवराज्यभिषेक समिती), समीर गुरव (सह संयोजक, भाजपा सोशल मीडिया),  राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे विनायक काळे, सामाजिक कार्यकर्ते सुहास नार्वेकर, रिझर्व्ह बँकेच्या माजी व्यवस्थापिका संगीता आमलाडी आदी विविध मान्यवरांचा समावेश होता.
याबाबत बोलताना रणजित सावरकर यांनी सांगितले की, सदर प्रकारामुळे महाराष्ट्रातील व देशातील जनतेला मोठा मनःस्ताप झाला असून हा राष्ट्रभक्तांचा अपमान झाला आहे. ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचे शीर्षक घेतले होते, त्यामुळे तसेच नंतर ज्या पद्धतीने माफी मागण्याचा प्रयत्न केला तो आम्हाला मान्य नाही, त्यामुळेच जनतेच्या भावना ध्यानात घेऊन वृत्तवाहिनीने माफी मागावी तसेच समाजमाध्यमांवरील क्लिप्सदेखील काढून टाकाव्यात, अन्यथा या वाहिनीवर आर्थिक बहिष्कार टाकावा लागेल. खासदार गोपाळ शेट्टी यांनी या विषयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला तसेच या आंदोलनाच्या मागे भाजपा पूर्ण ताकदीनिशी उभी राहिल, असे सांगितले. खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रभक्त जनतेची भावना विचारात घेऊन जाहीर माफी न मागितल्यास तीव्र पडसाद दिसून येतील, असे सांगितले. आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेची माफी एबीपीने मागावी तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून संपूर्ण क्लिप्स डिलिट कराव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

राजेंद्र वराडकर (कार्यवाह)

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *