पुणे: एप्रिल महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात भारताला सुवर्ण पदक जिंकून देत महाराष्ट्राचा तोरा उंचावणाऱ्या पैलवान राहुल आवारेला शासकीय सेवेत रुजू करुन घेणार असल्याची माहिती राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. राहुल आवारे आता डीवायएसपी होणार हे निश्चित झाले आहे. राहुल आवारे याला शासकीय सेवेत घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच नक्की केले आहे, अशी माहिती दिलीप कांबळे यांनी दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारेचा पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप कांबळे बोलत होते. तर महाराष्ट्र दिनाचं अवचिता साधून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ‘मांतोश्री निवास्थानी राहुल आवारेचा सत्कार केला. त्याच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्याला १० लाख रुपयांची मदतही दिली. उद्धव ठाकरेंच्या हस्तेच आर्थिक मदतीचा धनादेश राहुलला सुपूर्द करण्यात आला. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राहुलला १२ लाख रुपयांची शिष्यवृत्तीही जाहीर केली होती. पुण्यातील सत्कारावेळी शरद पवारांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी अभिजीत कटके आणि किरण भगत यांच्यापाठोपाठ राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे या दोन्ही पैलवानांना शरद पवारांच्या वतीनं प्रत्येकी १२ लाख रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली.]]>