सानिया मिर्झा आणि माजी चॅॅम्पियन मार्टिना हिंगीस या जोडीने विम्बल्डन २०१५ स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद फटकावले. ग्राॅॅड स्लाम फटकावणारी सानिया मिर्झा हि पहिली भारतीय महिला ठरली आहे. मिर्झा-हिंगीस या जोडीने एलेना व्हेसनिना आणि एकॅटरिना माकारोव्हा या रशियन जोडीला ५-७, ७-६, ७-५ असा पराभव करीत ऐतिहासिक कामगिरी केली. पहिला सेट ५-७ असा गमावल्यानंतर मिर्झा-हिंगीस ने शानदार पुनरागमन करीत टाय ब्रेक वर दुसरा सेट जिंकला. रशियन जोडीनेही जबरदस्त झुंज देत शेवटच्या सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेतली. मार्टिना हिंगीसने आपला आजवरचा अनुभव वापरत तिसरा सेट ७-५ असा जिंकला आणि आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. महिला दुहेरीत सानिया मिर्झाचं हे पहिल ग्राॅॅड स्लाम आहे. सानियाने या आधी मिश्र दुहेरीत तीन ग्राॅॅड स्लाम फटकावली आहेत. सानियाच्या या कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या.
Well played @mhingis & @MirzaSania. You played wonderful tennis & registered a fantastic win at @Wimbledon. We are proud & very happy.
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2015
]]>