कोची, दिनांक 25 नोव्हेंबर 2016 – केरळा ब्लास्टर्सने उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊल टाकताना हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत महत्त्वपूर्ण विजय नोंदविला. घरच्या मैदानावर त्यांनी एफसी पुणे सिटीला 2-1 असे हरविले. सामना शुक्रवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. केरळा ब्लास्टर्सने सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल नोंदवून विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. सामन्याच्या सातव्याच मिनिटाला डकेन्स नॅझॉन याने यजमान संघाला आघाडीवर नेले, नंतर 57व्या मिनिटाला कर्णधार अॅरोन ह्यूजेसने केरळाची आघाडी फुगविली. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये अनिबाल झुर्दो रॉड्रिगेझ याने पुणे सिटीची पिछाडी एका गोलने कमी केली, पण पाहुण्या संघासाठी हा गोल उशिरा झाला. पुणे सिटीचा अनुभवी गोलरक्षक अपौला इदेल बेटे याच्या आजच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे केरळा ब्लास्टर्सला मोठा विजय हुकला. केरळा ब्लास्टर्सचा हा स्पर्धेतील पाचवा विजय ठरला , तर घरच्या मैदानावरील सलग चौथा विजय ठरला. त्यांचे 12 सामन्यांतून 18 गुण झाले आहेत. केरळा ब्लास्टर्सला गुणतक्त्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे. एफसी पुणे सिटीला स्पर्धेतील सहाव्या पराभवामुळे धक्का बसला आहे.. त्यांचा फक्त एकच सामना बाकी आहे. 13 सामन्यांतून पुणे सिटीचे 15 गुण कायम राहिले आहेत. त्यांची आता पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. विश्रांतीला केरळा ब्लास्टर्सने एका गोलची आघाडी घेतली होती. सुरवातीच्या गोलमुळे यजमान संघाची स्थिती बळकट झाली. एफसी पुणे सिटीच्या बचावफळीतील चुकीचा लाभ उठवत डकेन्स नॅझॉन याने घरच्या संघाच्या पाठिराख्यांना जल्लोष करण्याची संधी मिळवून दिली. सामना सुरू होऊन फक्त सात मिनिटे झालेली असताना केरळाने आघाडी मिळविली. नॅझॉनने सामन्याच्या डाव्या बगलेतून अप्रतिम मुसंडी मारली. यावेळी पुणे सिटीची बचावफळी त्याला रोखू शकली नाही. नॅझॉनने गोलरक्षक गौरमांगी सिंगला चकवा देत गोलरक्षक अपौला इदेल बेटे याला हतबल ठरविले. पुणे सिटीने बरोबरीसाठी प्रयत्न केले, परंतु सदोष नेमबाजीमुळे त्यांना हताश व्हावे लागले. अराटा इझुमी दोन वेळा चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही इझुमीला 42व्या मिनिटाला बरोबरीची संधी होती. परंतु तो ऐनवेळी गडबडला. त्यापूर्वी 37व्या मिनिटाला इझुमी अगदी जवळून चेंडूला हेडरने योग्य दिशा दाखवू शकला नाही. केरळाचे प्रशिक्षक स्टीव कोपेल यांनी नव्या पायांना संधी देण्याच्या उद्देशाने पहिला गोल केलेल्या नॅझॉन याला बदलून जर्मन याला मैदानात पाठविले. उत्तरार्धातील बाराव्या मिनिटाला अॅरोन ह्यूजेस याने केरळा ब्लास्टर्सची आघाडी फुगविली. यजमानांचा कर्णधाराने मेहताब हुसेनच्या कॉर्नर किकवर सी. के. विनीत याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याने चेंडू छातीवर नियंत्रित केला आणि ह्युजेसला गोल करण्याची आयती संधी मिळ त्यानंतर 67व्या मिनिटाला पुणे सिटीचा गोलरक्षक बेटे याच्या दक्षतेमुळे केरळा ब्लास्टर्सला तिसरा गोल नोंदविता आला नाही. अंतोनियो जर्मन याने प्रतिस्पर्धी बचावपटूंना गुंगारा दिल्यानंतर गोलरक्षकाने जर्मन याला यशस्वी होऊ दिले नाही. त्यापूर्वी 64व्या मिनिटाला अंतोनियो जर्मनने पुणे सिटीच्या रिंगणात मुसंडी मारली होती, बचावपटूंनी घेरल्यानंतर त्याने सहकारी जोसू कुरैस याला चेंडू पुरविला. परंतु तो चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही. त्यानंतर 76व्या मिनिटाला केरळा ब्लास्टर्सला आणखी एक गोल हुकला, परंतु विनीत याच्या गोलरिंगणातील फटक्यात योग्य दिशा नव्हती. 79व्या मिनिटाला पुन्हा गोलरक्षक बेटे याच्या दक्षतेमुळे यजमान संघाला यश मिळाले नाही. यावेळी विनीतचा याला रोखताना बेटे याने भारतीय खेळाडूस यशस्वी होऊ दिले नाही. अनिबालने इंज्युरी टाईमच्या पाचव्या मिनिटाला जबरदस्त फ्रीकिकवर केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक संदीप नंदीला सामन्यात प्रथमच असाह्य ठरविले. यावेळी नंदीने चेंडू अडविण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न फोल ठरला. त्यापूर्वी 83व्या मिनिटाला पुणे सिटीचा कर्णधार महंमद सिसोको याचा फटका क्रॉसबारवरून गेल्यामुळे केरळा ब्लास्टर्सचे नुकसान झाले नाही.]]>