पहिल्या तीन कसोटी सामान्यांसाठी जाहीर केलेल्या १८ जणांच्या संघातून भुवनेश्वर कुमार व ऋद्धिमान सहा यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे तर जसप्रीत बुमरा फिटनेस नंतर दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल. एकदिवसीय मालिकेत १-२ ने पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने आज पाच सामान्यांच्या मालिकेसाठी पहिल्या तीन सामान्यांसाठी कसोटी संघ जाहीर केला. एकूण १८ जणांचा समावेश असलेल्या संघात दिनेश कार्तिकसह रिषभ पंतलाही समाविष्ट करण्यात आले आहे तर भुवनेश्वर कुमारला पाठीच्या दुखण्यामुळे माघार घ्यावी लागली आहे. संघाची धुरा विराट कोहलीवर असेल तर उप-कर्णधार म्हणून पुन्हा एकदा मुंबईकर अजिंक्य रहाणेवर जबाबदारी असेल. बऱ्याच दिवसापासून बहुचर्चित असलेल्या या मालिकेवर साऱ्यांच्या नजरा आहेत. मागच्या दौऱ्यातील विराट कोहलीचा फॉर्म पाहता सर्वात जास्त मदार कर्णधारावर असेल. चेतेश्वर पुजाराचा काऊंटी क्रिकेटमधील अनुभवही भारतासाठी कामी येईल. शिवाय रवींद्र जडेजा व रवींद्र जडेजा या अनुभवी फिरकी गोलंदाजांचाही फायदा भारतासाठी होणार आहे. भारतीय संघ खालीलप्रमाणे: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), करूण नायर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रेस रिलीजनुसार, भुवनेश्वर कुमारला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान पाठीला दुखापत झाली. बोर्डाच्या मेडिकल टीमच्या तपासणीनंतर त्याच्या संघ सहभागावर निर्णय घेण्यात येईल. तर जसप्रीत बुमरा दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी फिटनेस टेस्टनंतर उपलब्ध असेल.]]>