सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला राणीने गोल करीत भारताला दमदार सुरुवात करून दिली. पण लगेचच ११व्या मिनिटाला जपानच्या कनोन मोरीने गोल करीत बरोबरी साधली. दोन्ही तुल्यबळ संघांत जरी काट्याची टक्कर असली तरी फॉर्मात असलेल्या भारतचे पारडे जड होते.
पहिल्या सत्रात एक-एक अशी बरोबरी साधलेल्या दोन्ही संघांना पुढील सत्रात गोल करता आला नाही. दोन्ही संघांच्या बचाव फळीने चोख कामगिरी बजावत सामन्यात रंगात आणली. तिसऱ्या सत्रातही जवळपास तशीच कामगिरी पाहायला मिळाल्यानंतर सत्राच्या शेवटच्या मिनिटाला गुरजीत कौरने गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली. शेवटच्या सत्रातही काहीशी तशीच परिस्थिती पाहायला मिळाल्यानंतर गुरजीतने पुन्हा एकदा शेवटच्या मिनिटाला आपली जादू दाखवत भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून देत विजय मिळवून दिला.
]]>