मुंबई (११ ऑक्टोबर, २०१६): दस-याच्या मुहूर्तावर आज श्री शहाजी राजे क्रीडा संकुलातील मुंबई फ़ुटबाँल अरेना येथे झालेल्या यजमान मुंबई सिटी एफ. सी. विरद्ध आटलाटिको डी कोलकाता यांच्यातील सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी आपल्या घराच्या प्रेक्षकांना चांगले मनोरंजीत केले. सामान्यांच्या सुरुवातीपासूनच खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. उत्तरार्धात कोलकाताच्या संघाने आपला सर्वश्रेष्ठ खेळ दाखवत सामन्यात बरोबरी साधली आणि सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. मुंबई सिटी एफ सी चा कर्णधार (मर्क्यू प्लेयर) डियागो फोरलान आजच्या सामन्यात खेळू शकला नाही. आजच्या सामन्यात कर्णधार पदाची धुरा ब्राझिलियन गोलकिपर रॉबर्टो वोलपटो याच्यावर सोपवण्यात आली. कोलकाताच्या स्टार खेळाडू लायन हुमे याने आपल्या संघासाठी आक्रमक खेळ केला परंतु मुंबईच्या खेळाडूंनी तितकाच प्रतिउत्तर देत कोलकाताच्या आक्रमणाला भेदले. सहाव्या मिनिटाला हुमेने हेडरच्या साहाय्याने गोल करण्याचा प्रयन्त केला परंतु गोलकिपर रॉबर्टोने चांगला बचाव केला. दोन्ही संघ आपापल्या मर्क्यू प्लेयरविना खेळात असल्यामुळे संघांच्या हंगामी कर्णधारांवर मोठी जवाबाबदारी होती. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघाना प्रत्येकी एक एक यलो कार्ड मिळालं. मुंबईचा खोगंजी तर कोलकाताच्या प्रीतम कोटात यांना पंचानी यलो कार्ड दिलं. लगेचच मुंबईच्या अनुभवी डी फेड्रिकोने सुरेख पासवर गोल करीत यजमानांना महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मुंबईच्या आक्रमक खेळामुळे कोलकाताच्या संघ काहीसा दबावात व अडचणीत आला. त्यानंतर दोन्ही संघ गो करण्याचा प्रयन्त करू लागले परंतु दोन्ही संघांचा बचाव सुरेख असल्यामुळे गोल करता आला नाही. सामान्यांच्या पूर्वार्धात मुंबईने १-० अशी महत्वाची आघाडी घेतली. दुस-या हाफमध्ये कोलकाताच्या संघाने आपला अनुभव कामी लावत सामन्यात आपले वर्चस्व दाखवले. कोलकाताच्या बॉर्जा फर्नांडिस हा हिरो इंडियन सुपर लिग मध्ये ३००० मिनिटे खेळणारा पहिला खेळाडू ठरला. मुंबईचा प्रणॉय याला सामन्याच्या ५३ व्या व ७२ व्या मिनिटाला यलो कार्ड देण्यात आलं. परिणामी त्याला सामन्याच्या बाहेर पडाव लागलं. ७२ व्या मिनिटापासुन मुंबईचा संघ १० खेळाडूंनीशी खेळला. याचाच परिणाम म्हणून की काय कोलकाता संघाने मुंबईवर आपलं वर्चस्व गाजवलं. सामान्यांच्या ८२ व्या मिनिटाला कोलकाताच्या अनुभवी लारा ग्रांडे याने अचूक गोल करीत कोलकाताच्या मोक्याच्या वेळी महत्वपूर्ण अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मुंबईला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीही मिळाली नाही. दुस-या हाफ पूर्णपणे कोलकाता संघाने आपल्या नावे केला आणि सामना १-१ अश्या बरोबरीत सोडवला. या सामन्याबरोबरच मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला. आतापर्यंतच्या झालेल्या ३ सामन्यात मुंबई २ विजयांसह अव्वल स्थानी विराजमान झाला. मुंबईचा पुढील सामना १४ तारखेला केरला बास्टार्स बरोबर होईल.]]>