मुंबई (७ ऑक्टोबर २०१६): श्री शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल येथे झालेल्या इंडियन सुपर लीग २०१६ च्या सामन्यात यजमान मुंबई सिटी एफ सी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी विरुद्ध नाणेफेक जिंकून डावीकडून उजवीकडे आक्रमक सुरुवात केली. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईच्या संघाने सामान्यांच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सातव्या मिनिटाला डीफेड्रिक याला मिळालेल्या फ्री किकचा फायदा मुंबईला घेता आला नाही. त्यानंतर लगेच नवव्या मिनिटाला मुंबईला कॉर्नर मिळाला परंतु याही वेळेस नॉर्थ ईस्टच्या बचाव फळीने मुंबईला गोलपासून वंचित ठेवले. ११ व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टला पहिला फ्री किक मिळाला परंतु मुंबईनेही आपली तगडी बचाव फळी व्यवस्थित वापरून नॉर्थ ईस्ट संघाला गोल करून दिला नाही. नॉर्थ ईस्ट युनायटेडचा रोमारिकने १५ व्या मिनिटाला केलेला एक शानदार किक गोल होईल कि काय असे वाटत असताना मुंबईचा ब्राझिलियन गोल किपर रॉबर्टो वोलपाटोने आपला अनुभव कमला लावत छानसा बचाव केला. त्यानंतर अधून मधून दोन्ही संघाना फ्री किक मिळाले परंतु दोन्ही संघानी बचावावर भर दिल्यामुळे कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. सामानन्याचा ३१ व्या मिनिटाला नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सीचा रॉलीन बोर्ग्सला पिवळे कार्ड मिळाले. मध्यंतराच्या शेवटी शेवटी दोन्ही संघानी आक्रमक पवितत्रा घेतला परंतु कोणालाही गोल करण्यात यश आलं नाही. मध्यान्तनंतर दोन्ही संघ ० – ० अश्या बरोबरीत होते. उत्तरार्धात मुंबईच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत पाहुण्या संघावर दबाव टाकला. सामन्याच्या ५५ व्या मिनिटाला कर्णधार डियागो फॉरलॅन याने पेनल्टीचा पुरेपूर फायदा उचलत मुंबईला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मुंबईचा संघ आपल्या घराच्या मैदानावर खेळताना चांगला बचाव व आक्रमण करताना दिसत होता. मुंबईने उत्तरार्धात नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाला कोणतीही संधी दिली नाही. मुंबईच्या प्रणॉयला ६९ व्या मिनिटाला यलो कार्ड देण्यात आले. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना नॉर्थ ईस्ट संघाने काहीसा आक्रमक पवित्रा घेतला. परंतु मुंबईचा बचाव व गोल किपर रॉबर्टो वोलपाटोने नॉर्थ ईस्ट संघाच्या एकही प्रयत्नांना यश मिळू दिलं नाही. आपले पहिले दोन्ही सामने जिंकणाऱ्या नॉर्थ ईस्ट संघाला गुण तालिकेत अव्वल स्थानी राहण्यासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. सामन्याची दहा मिनिटे शिल्लक असताना मुंबईच्या खेळाडूंची आक्रमक पवित्रा घेत पाहुण्या संघाला अडचणीत टाकले. घराच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबईने आपल्या प्रेक्षकांना चांगल्या पैकी मनोरंजीत केले. ५ मिनिटे बाकी असताना नॉर्थ ईस्ट संघाने आपले आक्रमण अधिक वाढवले. परंतु मुंबईच्या बचावाने त्यांना एकही गोल करू दिला नाही. ३ मिनिटांचा वेळ वाढून दिल्यानंतर नॉर्थ ईस्ट संघाने आक्रमण वाढवले आणि त्यांना या वाढीव वेळेत ३ कॉर्नर मिळाले. मुंबईने आपला तगडा बचाव चालू ठेवत प्रतिस्पर्धी संघाला गोल करू दिला नाही. मुंबईने सामना १-० असा जिंकत आपले विजयी अभियान चालू ठेवले.]]>