जालना: महाराष्ट्राच्या कुस्तीच्या इतिहासात मानाची मनाली जाणारी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा बुलढाण्याच्या बालारफिक शेखने एकतर्फी झालेल्या मुकाबल्यात गतविजेत्या अभिजित कटकेवर ११-३ ने मात करीत ६२वी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. मॅटचा बादशाह मनाला जाणारा अभिजित या स्पर्धेत फेव्हरेट मनाला जात होता. पण अनुभवाने मार्तबगार असलेल्या बालाने वर्चस्व गाजवीत हि स्पर्धा जिंकली.
अभिजितने सामन्याच्या सुरुवातीला आक्रमक सुरुवात करीत सामन्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. पण रफिकने त्याचा अनुभव पणाला लावीत अभिजतला तितकीच जोरात टक्कर दिली. रफिकने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. त्याने अभिजितवर नंतर पूर्णपणे वर्चस्व ठेवत त्याला कोणतीही संधी दिली नाही. पैलवान बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला तर अभिजितने सोलापूरच्या रविंद्र छत्रपत्राला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. एकंदरीत, बालारफिकची ही तिसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती.
२६ वर्षीय पैलवान बालारफिक हा कोल्हापूरचे वस्ताद हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचा शिष्य आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने न्यू मोतीबाग तालीमीत कुस्तीतील सुरुवातीचे धडे गिरवले आहेत. कुस्तीपटू म्हणून त्याला आळंदकरांनी तयार केले. काही महिन्यांपूर्वी गणपतराव आंदळकरांचे निधन झाले. पण त्यांच्याकडे कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या बालारफिकने महाराष्ट्र केसरी जिंकत आपल्या गुरूला ही गदा समर्पित केली.
बालारफिकची कुस्ती पाहण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. ६ फूट ३ इंच उंची असलेल्या बालारफिकच्या यशानंतर त्याचे वडील आझम शेख आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “लाकडाच्या व्यवसायातून जे दोन पैसे येत होते. ते आम्ही बालाच्या खूराकासाठी तो कोल्हापूरला असताना पाठवले आहेत. त्यातून त्याची प्रगती होत गेली. मी माझ्या घरात कधी भेदभाव केलेला नाही. जे मोठ्या मुलीला दिल तेच सर्व बालालाही खायला मिळाले.”
खुद्द आझम शेख हेही कुस्तीपटू होते. त्यांनी जवळजवळ ३० वर्षे कुस्ती खेळले आहेत. शिवाय, बालारफिकने त्यांच्या वडिलांबरोबर कुस्ती खेळली आहे. त्याबद्दल बोलताना ते बोलले, “आमच्यावेळी बदाम तूप असं काही नव्हतं. साधं दुध, भाकरी, हुरडा खायचो. यावरच आमची कुस्ती होती.”
]]>