विराट कोहलीचे यंदाचे तिसरे द्विशतक, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय, तर जयंत यादवचे कसोटी क्रिकेटमधले पहिले शतक. जडेजाने केल्या कसोटीमध्ये १०० विकेट्स पूर्ण. भारत चौथी कसोटी जिंकण्यापासून केवळ ४ गडी दूर. मुंबई(दि. ११ डिसेंबर, २०१६): भारताचा कर्णधार आणि ‘रनमशीन’ विराट कोहली आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या जयंत यादवने पहिल्या सत्र भरगच्च वानखेडेवर उपस्थित प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. कालच्या नाबाद १४७ धावांवर डाव सुरु करीत कोहलीने आपल्या १५० धावा पूर्ण केल्या. यंदाच्या वर्षात कोहलीचे हे चौथ्यांदा एका डावात १५० हून अधिक धावा होत्या. लगेच या जोडीने आठव्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी केली. आपला तिसराच सामना खेळणाऱ्या जयंत यादवने संयमी फलंदाजी करीत आपले दुसरे अर्धशतक झळकावले. काल दुसर्या सत्रात भारताने ४ गडी गमावल्याने भारत मोठी आघाडी घेईल की नाही असे दिसत असताना कोहली-जयंत या जोडीने अगदी संयमी फलंदाजी करीत भारताला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. भलत्याच फॉर्मात असलेल्या विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावत उपस्थित वानखेडेवरील प्रेक्षकांचीमाने जिंकली. प्रेक्षकांनीही आपल्या लाडक्या कर्णधाराला उभे राहून टाळ्यांच्या गजरात अभिवादन केले. एका वर्षात ३ द्विशतके झळकावणारा कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. तसेच एक कर्णधार म्हणून अशी कामगिरी करणारा तो तिसरा कर्णधार ठरला. या अगोदर ऑस्ट्रेलियाच्या क्लार्केने ४ वेळा तर न्यूझीलंडच्या मॅकुलमने ३ वेळा एका वर्षात द्विशतक झळकावले आहे. पहिल्या सत्राअखेरीस भारत ७ बाद ५७९ करून १७९ धावांनी आघाडीवर होता. दुसर्या सत्रात भारत पटापट धावा करून डाव घोषित करणार असे अपेक्षित होते. नाबाद असलेल्या जयंत यादवने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत कर्णधार कोहलीच्या विश्वासाला सार्थ साथ दिली. कोहली जयंतच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने ६०० धावांचा पल्ला गाठला. भारताने २०० धावांची आघाडी घेतल्यानंतर जयंत यादव १०४ धावा करून बाद झाला. लगेचच कोहलीही एक मोठा फटका फटका मारण्याच्या नादात डीप एक्स्ट्रा कव्हरला अँडरसनच्या गोलंदाजीवर वोक्करावी झेलबाद झाला. त्याने २५ चौकार व १ षटकारासह २३५ धावा केल्या. शेवटच्या गड्यासाठी उमेश यादव व भुवनेश्वर कुमार यांनी १६ धावा करीत भारताला ६३१ धावसंखेवर आणून ठेवले. इंग्लंडतर्फे आदिल रशीदने ४, मोईन अली, जो रूट यांना प्रत्येकी २ तर वोक्स, बॉल यांना प्रत्येकी १ बळी मिळाला. भारताने पहिल्या डावात २३१ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने आपला डाव सुरु करताच पहिल्या डावातील शतकवीर जेनिंग्सला भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात पायचीत केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. जेनिंग्सला आपलं खातही खोलात आलं नाही. तिसर्या क्रमांकावर आलेल्या रूटने नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली. वेगवान गोलंदाजांच्या ६ षटकानंतर कोहलीने आपले प्रमुख हत्यार फिरकी गोलानादाजांना आमंत्रित केलं. जडेजा-अश्विनाच्या जोडीने कुक रुटला दबावात टाकले. याच दबाव तंत्राचा फायदा जडेजाला मिळाला आणि त्याने कुकला चालते केलं. कुकला जडेजाने १८ धावांवर पायचीत केले. कुक बाद झाल्यानंतर आलेल्या मोईन अलीला जडेजाने खातेही खोलू दिले नाही. मुरली विजयाने लेग स्लीपमध्ये एक अप्रतिम झेल घेत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. अली बाद झाल्यानंतर पंचांनी चहाची घोषणा केली. चहापानापर्यंत इंग्लंडने ३ बाद ४९ धावा केल्या होत्या. दिवसाच्या तिसर्या व शेवटच्या सत्रात जो रूट व बेस्ट्रो या जोडीने भारतीय गोलंदाजांची चांगलीच पिटाई केली. दोघेही चारच्या रन रेटने सहावा करीत होते. जो रूटने ७५ चेंडूत आपले २६वे अर्धशतक लगावत इइंग्लंडच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. रूट चांगला खेळत असताना जयंत यादवने त्याचा अडथळा दूर करीत इंग्लंडला मोठा धक्का दिला. रूट बाद एका बाजूने तग धरून बसलेल्या बेस्ट्रोने आपले अर्धशतक पूर्ण केले. बेस्ट्रो इंग्लंडचा डाव सावरतो ना सावरतो तोच अश्विनने स्टोक्सला बाद करीत इंग्लंडला मोठा धक्का दिला. इंग्लंडची अवस्था ४८व्या षटकात ५ बाद १८० अशी झाली. आजच्या दिवसाचे शेवटचे षटक चालू असताना अश्विनने बॉलला बाद करीत पाहुण्यांना सहावा धक्का दिलं आणि भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ६ बाद १८२ केल्या. इंग्लंडतर्फे बेस्ट्रो ५० धावांवर नाबाद होता. भारतातर्फे अश्विनने ४८ धावांत २ तर जडेजाने ४८ धावांत २ बळी घेतेले. भारताला विजयासाठी उद्याच्या शेवटच्या दिवसात जिंकण्यासाठी ४ विकेट्सची आवश्यकता आहे तर इंग्लंडला भारताची बरोबरी करण्यासाठी ४९ धावांची गरज आहे.]]>