केरला ब्लास्टर्सची चपळाई आणि पंचांची घाई ठरली मुंबई सिटी एफ. सी. च्या पराभवाला जबाबदार मागील पाच सामन्यांमध्ये तीन सामन्यांत विजय एक सामना बरोबरीत राखल्यानंतर अंतिम चार मध्ये येण्यास उत्सुक असलेल्या मुंबई सिटी एफ. सी. संघाने मागील सामन्यातील अंतिम अकरा मध्ये एक बदल: गायकवाडच्या जागी युवा दविंदर सिंगला संधी देत घराच्या मैदानावर सचिन तेंडुलकरच्या केरला ब्लास्टर्स एफ. सी. ज्यांनी आपल्या संघांत मागच्या अंतिम अकरा मध्ये दिमितारच्या जागी सिफनियॉस व मिडफिल्ड मध्ये सियाम हंगलच्या जागी मिलन सिंघला संधी देत सामन्याची सुरुवात केली. पहिला हाफ केरलाचा जिथे मुंबई सिटी एफ. सीचे पारडे आजच्या सामन्यात जाड वाटत होते तिथे केरला ब्लास्टर्स एफ. सी. संघाने अगदी पहिल्याच मिनिटापासून एक वेगळाच पवित्रा घेतला आणि यजमान मुंबई सिटी एफ. सी. संघाला गोच्यात टाकले. सुरुवातीपासूनच आक्रमकतेवर भर देत केरलाने मुंबईची बचाव फळी भेदण्यास सुरुवात केली. १२ व्या मिनिटाला केरलाला एक संधी मिळाली खरी परंतु त्यांना त्याचा पाहिजे तास फायदा उचलता आला नाही. लगेच दोन मिनिटांनी मिलन सिंघल एक फ्री-किक मिळाला परंतु मुंबईचा कर्णधार लुसियन गोयन याने प्रयत्न करून केरला ब्लास्टर्सचा हा प्रयत्न हणून पाडला. केरला ब्लास्टर्सचा विवादित गोल सामान्याच्या २३ व्या मिनिटाला संघाला एक फ्री-किक मिळाला. पंच खेळाडूंना सेट करणार होते इतक्यात करेज पिकुसनने एक शानदार पास केला आणि इंडियन सुपर लीग मधील टॉप स्कोरर इयान हुमेने मिळालेली संधी चांगलीच सध्या करीत केरला ब्लास्टर्सचं खातं खोललं. तर दुसरीकडे मुंबई सिटी एफ. सी. संघाचे खेळाडू पंचांच्या फ्री-किक नंतर इशाऱ्याची वाट पाहत होते. अश्यातच पंचांनी कौल केरला ब्लास्टर्स एफ. सी. संघाच्या बाजूने दिला आणि मुंबईच्या खेळाडूंनी पंचांकडे एकाच हुज्जत घातली. परंतु पंचावर याचा काहीच परिणाम झाला नाही आणि शेवटी निर्णय केरला ब्लास्टरच्या बाजूनेच लागला. पूर्वार्धाचा आकडेवारीत जर विचार केला तर दोन्ही संघाकडे चेंडूचा ताबा जवळजवळ सारखाच मिळाला होता. मुंबईने ४९% चेंडूवर नियंत्रण मिळवले होते तर केरलाने ५१%. मुंबईने केरलाच्या आक्रमणाला तोडीस तोड उत्तर दिले असे म्हटले तर वावगळ ठरणार नाही. पासेसचा विचार केला तर मुंबईने १८१ वेळा चेंडू पार केला तर तोच आकडा केरला संघासाठी होता तो तब्बल २००. कदाचित याचाच फायदा त्यांना पहिल्या हाफमध्ये १-० अशी आघाडी घेण्यास मिळाला. केरलाची आघाडी कायम ०-१ अश्या पिछाडीवर असलेल्या मुंबई सिटी एफ. सी. संघाला उत्तरार्धात गोल करून सामन्यात बरोबरी करण्याचं पाहिलं आव्हान होत. मुंबईचा यंदाचा टॉप स्कोरर बलवंत सिंगने दुसऱ्या हाफची तशी सुरुवातही केली. मिडफिल्डर एव्हरटोनने एक सुरेख पास बळवंतला देत मुंबईला एक संधी दिली परंतु बळवंतने मारलेला हेडर गोलपोस्ट पार करू शकला नाही. एकीकडे केरला ब्लास्टर्सचा पहिल्या हाफमधील गोल वादाच्या भोवऱ्यात सापडला तर उत्तरार्धात मुंबईच्या बलवंत सिंगने चपळाईने पास केलेला चेंडू गोलपोस्टच्या दांड्याला लागला आणि मुंबई सिटी एफ. सी. संघाच्या खेळाडूंनी गोलसाठी मागितलेली दाद पंचांनी फेटाळून लावली. या वेळेस मात्र पंचांनी अगदी योग्य तो निर्णय दिला. सामना संपण्यास अगदी काहीच मिनिटे शिल्लक असताना मुंबई संघाने थोडाशी आक्रमकता वाढवली. याचा त्यांना थोडासा फायदाही झाला पण काही प्रमाणात नुकसानही सहन करावा लागला. कर्णधार लुसियन गोयन बरोबरच बलवंत सिंगनेही आपली आक्रमकता वाढवली. परंतु अनुभवाने परिपूर्ण असलेल्या केरलाच्या संघाने मुंबईला डोकं वर काढू दिल नाही. परिणामी केरला ब्लास्टर्स १-० अशी आघाडी कायम ठेवत मुंबईला घराच्या मैदानावर मात देण्यास यशस्वी ठरला.]]>