काहीश्या तगड्या झालेल्या सामन्यात १६व्या क्रमांकावर असलेल्या चिलीनेही भारताला सुरुवातीस टक्कर दिली. पहिल्या सत्रात गोलशून्य लढत झाल्यामुळे भारतीय संघाला उरलेल्या तीन सत्रांत गोल करून आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. पहिल्या सत्रात भारताला गोल करण्याच्या तब्बल पाच संधी मिळाल्या. परंतु, चिलीची बचाव फळीने आपली कामगिरी फत्ते पार पाडत भारताला प्रत्येक वेळेस निराश केले.
दुसऱ्या सत्रात १८व्या मिनिटाला चिलीने गोल करीत भारतावर दडपण आणले. कोंसेलो दे लास हेरास हिने केलेल्या पासवर कॅरेलिनो गार्सिया हिने गोल करीत चिलीचे खाते उघडले. पण अनुभवाने परिपक्व असलेल्या भारताने २२व्या मिनिटाला गोल करीत सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या सत्रात भारताने चेंडूवर ताबा मिळवीत २५ यार्डच्या सर्कलवरून धाव घेत स्ट्रायकिंग सर्कलपर्यंत जात गोलपोस्टवर निशाणा साधला. ३७व्या मिनिटाला भारताला पेनल्टी बहाल करण्यात आणि. याचा भारताने पुरेपूर फायदा घेत गुरजीत कौरने भारताला आणखी एक गोल करून दिला.
३-१ अश्या आघाडीवर असलेल्या भारताने चिलीला ४३व्या मिनिटाला गोल बहाल करीत सामन्यात रंगात आणली. ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्यक होता. याचेच भान थुं भारताने शेवटच्या सत्रात सामना संपण्यास केवळ तीन मिनिटे शिल्लक असताना कर्णधार राणी रामपालने सुरेख गोल करीत आघाडी ४-२ अशी मजबूत केली आणि ऑलिम्पिकमध्ये आपला प्रवेश निश्चित केला.
]]>