शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने दणदणीत षटकार ठोकत भारताला निधास चषक फाटकावून दिला. कोलंबो: १८ चेंडूंत ३५ धावांची गरज. विजय शंकर सामना करणार होता मुस्तफिझूर रेहमानचा. पहिले चार चेंडू निर्धाव. पाचव्या चेंडूवर एक लेग बाय. आता स्ट्राईकवर आला होता तो मनीष पांडे. मुस्तफिझूरचा आणखी एक फुल लेन्थचा चेंडू आणि लॉंगऑनला सोपा झेल. या एका षटकाने सामान्याचं समीकरण आलं ते १२ चेंडू आणि ३४ धावा. शिवाय एक नवीन फलंदाज. १९ व्या षटकात दिनेश कार्तिकने आपल्या अनुभवाची कसोटी पणाला लावत रुबेल हुसेनच्या षटकात दोन चौकार व दोन खणखणीत षटकार खेचत तब्बल २२ धावा कुठल्या आणि शेवटच्या षटकात समीकरण आणलं ते सहा चेंडू १२ धावांवर. एकीकडे विजय शंकरला पाहिजे तसा खेळ करता आला नव्हता तिकडे बांगलादेशकडेही शेवटचे षटक टाकण्यास अनुभवी गोलंदाज नव्हता. मग काय सौम्या सरकारने जबाबदारी उचलली. पहिल्या चार चेंडूंत केवळ सात धावा दिल्या आणि पाचव्या चेंडूंवर शंकरला बाद करीत शेवटच्या चेंडूवर पाच धावा असे गणित आणले. मग काय, दिनेश कार्तिकने कव्हर्सच्या दिशेला चेंडू टोलावत भारताला विजयश्री खेचून आणले आणि बांगलादेशच्या खेम्यात रडायची सुरुवात झाली. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर निधास ट्रॉफी २०१८ च्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकत बांगलादेशला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. भारताने मोहम्मद सिराजच्या जागी जयदेव उनादकतला संधी दिली. संयमी सुरुवात केलेल्या बांगलादेशच्या डावाला युवा वॉशिंग्टन सुंदरने खिंडार पडत पहिला धक्का दिला. लिंटन दास (११) या रैनाकरवी झेलबाद केले तर पुढच्याच षटकात चहलने तमिम इक्बालला (१५) धावांवर बाद करीत दुसरा धक्का दिला. एकाकीकडे बांगलादेशचे गडी एकामागून एक बाद होत होते तर दुसरीकडे सब्बीर रेहमानने दुसरी बाजू मजबूत राखत भारताच्या वेगवान गोलंदाजांवर हल्ला चालू ठेवला. चार षटकार व सात चौकारांच्या मदतीने त्याने ५० चेंडूंत ७७ धावा कुठल्या. शेवटच्या षटकात शार्दूल ठाकूरला ठोकलेल्या १८ धावांच्या मदतीने बांगलादेशने १६६ धावांचा पल्ला गाठला. पाठलाग करण्यास उतरलेल्या भारताने दमदार सुरुवात केली खरी परंतु शिखर धवन (१०) व सुरेश रैना (०) हे दोन खंबीर खेळाडू पाठोपाठ बाद झाल्याने भारताच्या धावगतीवर लगाम लागण्यास बांगलादेशच्या गोलंदाजांना काही अंशी यश आलं. भारताच्या मधल्या फळीतील गोलंदाजांनी केलेली कमकुवत फलंदाजीने सामना खूपच रंगतदार आला. दिनेश कार्तिकच्या आगोदर वर्णी लागलेल्या विजय शंकरने कामचलाऊ फलंदाजी केली खरी परंतु त्याने केले डॉट चेंडू भारतीय प्रेक्षकांना खूपच महाग पडले. दरम्यान, रोहित शर्माने आपला आणखी एक नजराणा पेश करीत १४ वे टी-२० अर्धशतक झळकावले. संपूर्ण मालिकेत आपल्या गोलंदाजीची झाप सोडलेल्या वॉशिंग्टन सुंदरला मालिकावीराचा खिताब देण्यात आला.]]>