कमकुवत समजल्या जाणार्या बांगलादेश समोर आपले पहिले दोन सामने गमावून मालिका गमावणार्या भारताची अस्तित्वाची लढाई उद्या होणार्या तिसर्या व अंतिम सामन्यात असेल. अतिशय लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघासमोर आव्हान असेल ते मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारतीय रसिकांना काही प्रमाणात खुश करण्याची. पहिल्या दोन सामन्यांत दारूण पराभव झाल्यानंतर संपूर्ण भारतभरात भारतीय संघाचा विरोध करण्यात आला. या संपूर्ण पराभवात कर्णधार धोनीला जबाबदार धरण्यात आले. बर्याच प्रमाणात झालेल्या चुका आणि प्रती स्पर्धी संघाला डावपेच आखण्यात भारत कमी पडला आणि दोन्ही सामन्यात दारूण पराभव स्वीकारावा लागला. दुसर्या सामन्यात अजिंक्य रहाणेला दिलेली विश्रांती, कर्णधार धोनीने केलेली चौथ्या क्रमांकावर केलेली बढती तसेच जडेजाची सुमार कामगिरी या सर्व कारणांमुळे भारताला पहिल्यांदाच बांगलादेश विरुद्ध मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली. दुसरीकडे फॉर्मात असणाऱ्या बांगलादेशने आपला सर्वोच्च खेळ करीत तमाम क्रिकेट विश्वाचे मन जिंकले. त्यांचा हा घराच्या मैदानावर सलग दहावा विजय आहे . बांगलादेशने तिन्ही स्तरात चमकदार कामगिरी केली आणि पाकिस्तानपाठोपाठ भारतालाही धूळ चारली. या मालिका विजयाबरोबर त्यांनी २०१७ साली इंग्लंड मध्ये होणार्या चँपियांस करंडक स्पर्धेतही स्थान मिळवले. ]]>