हरारे: भारताचा अनुभवी कर्णधार महेंद्र सिंघ धोनीच्या युवा संघाने आज झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात ८ गड्यांनी मात करीत ३ सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. १२७ धावांचं लक्ष भारतीय संघाने २७व्या षटकात दोन गडी गमावत सामना जिंकला. युवा चाहलने आपली चमकदार कामगिरी करीत सामनावीराचा किताब फटकावला. भारताने नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. चांगली सुरुवात करूनही झिम्बाब्वे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. झिम्बाब्वेने शेवटचे ६ गडी अवग्या २० धावांत गमावले आणि त्यांचा डाव १२६ धावांत संपुष्टात आला. चाहलने ३ तर कुलकर्णी, बरींदर सरनने प्रत्येकी २ बळी घेतले. प्रतीउत्तरादाखल उतरलेल्या भारतीय संघाने सावध सुरुवात केली. मागच्या सामन्यात हिरो ठरलेल्या के एल राहुल आज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्याला चीभाभाने ३३ धावांवर त्रिफळाचीत केला. त्यानंतर आलेल्या रायडूने सलामीवीर नायरसह भारताला लक्ष गाठून दिला. जिंकण्यासाठी केवळ २ धावा पाहिजे असताना नायर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या पांडेने चौकार ठोकत भारताला सामना तसेच मालिकाही जिंकून दिली.]]>