भुवनेश्वर: तब्बल ४३ वर्षांनी पुन्हा एकदा इतिहास होईल आणि एके काळाचा हॉकीचा दादा संघ म्हणून आपली झाप सोडलेल्या भारताला नेदरलँड विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात १-२ ने पराभव स्वीकारून विश्वचषकातून आपला काशा गुंडाळावा लागला. ‘हॉट-फेव्हरेट’ म्हणून स्पर्धेत उतरलेल्या भारतीय संघाला अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागल्यामुळे प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानातून निराश होऊन बाहेर पाडण्यावाचून पर्याय नव्हता.
‘क’ गटात तीनपैकी दोन सामने जिंकत भारताने आवळा स्थान फटकावत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे नेदरलँडने क्रॉस-ओव्हर मध्ये कॅनडाचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताचा मुकाबला जरी चौथ्या क्रमांकाच्या नेदरलँडविरुद्ध असला तरी घराच्या मैदानावर खेळणाऱ्या भारताला निश्चितच फायदा होता. आणि भारतीय संघाने साखळी सामान्यांच्या तीनही सामन्यांत ज्या प्रकारे खेळ केला होता, त्यावरून भारत नक्कीच अंतिम फेरी गाठेल असे दिसत होते.
पहिल्या क्वार्टरमध्ये भारताच्या आकाशदीपने १२व्या मिनिटाला गोल करीत भारताला अपेक्षितपणे चांगली सुरुवात करून दिली. पण भारताचे हे यश जास्त काळ टिकू शकले नाही. पहिल्या सत्राच्या शेवटच्या म्हणजेच १५व्या मिनिटाला थेरी ब्रिन्कमनने नेदरलँडला बरोबरी साधून दिली. पुढील दोन्ही सत्रांत दोन्ही संघांनी काहीसा बचावात्मक खेळ करीत सामन्याची रंगात वाढवली.
शेवटच्या सत्रात सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना गोल धाडणे अपेक्षित होते. अश्याच वेळेत नॉक-आऊट गेम असल्यामुळे कोणत्याही प्रकारे चुकी करणे संघासाठी घातक ठरणार होती. आणि जे अनपेक्षित होते तेच झाले. भारताच्या एक चुकीचा फायदा नेदरलँडला झाला. सामन्याच्या ५०व्या मिनिटाला भारताच्या चुकीमुळे नेदरलँडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. नेदरलँडच्या मिंक वॅन डर वीरडेन याने अचूक वेध घेत नेदरलँडला आघाडी मिळवून दिली. नेदरलँडने आपली आघाडी शेवटच्या मिनिटापर्यंत टिकून ठेवत भारताला पराभूत केलं. नेदरलँडचा उपांत्यफेरीचा सामना जगजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
]]>