अटीतटीच्या सामन्यात बिहारचा केला ५-४ ने पराभव भोपाळ (मध्य प्रदेश): येथे झालेल्या आठव्या हॉकी इंडिया पुरुष गटातील राष्ट्रीय जेतेपद २०१८ (ब डिविजन) च्या अंतिम सामन्यात हॉकी कर्नाटका ने हॉकी बिहारचा ५-४ असा पराभव करीत जेतेपदाला गवसणी घालत ‘अ’ गटात धडक मारली. अंतिम सामन्यात कर्नाटकाच्या पवन माडीवालकरने पाचव्याच मिनिटाला गोल करीत सामन्यात आघाडी घेतली. पण बिहारने सचिन डुंगडुंगने लगेचच आठव्या मिनिटाला गोल करीत कर्नाटकाची हि आघाडी मोडीत काढली. बिहारच्या नंतर दहाव्या मिनिटाला जॉन्सन पुत्रीकरवी गोल करीत आघाडी घेतली परंतु कर्नाटकाच्या सी. एस. समंथाने १३ व्या मिनिटाला चेंडू गोलपोस्टमध्ये धाडत २-२ अशी आघाडी साधली. पूर्वार्धात दोन्ही संघ एकमेकांवर भारी पडत उपस्थित प्रेक्षकांना चांगलाच मनोरंजन करून दिला. कर्नाटकाच्या पवनने २७ व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा तर संघासाठी तिसरा गोल करीत कर्नाटकाला आघाडी मिळवून दिली. बिहारच्या आनंद कुमार बराने ३५ व्या मिनिटाला गोल करीत सामन्याची रंजक आणखीच वाढवली. उत्तरार्धात ४-३ अशी आघाडी घेतलेल्या बिहारला शेवटच्या ११ मिनिटांत कर्नाटकाने चांगलेच रडवत दोन गोल करीत जेतेपदाला गवसणी घातली. बी. एन. चेल्सी मेडाप्पा (५९’) व पवन पवन माडीवालकर (६५’) यांनी कर्नाटकाला हे दोन करून जेतेपद मिळवीन दिले. दुसरीकडे ‘अ’ डिविजन मध्ये झालेल्या सामन्यात अ गटात हॉकी महाराष्ट्राने हॉकी दिल्लीचा ५-१ असा मोठा पराभव केला. महाराष्ट्राच्या या विजयात वेंकटेश केंचे (११’, ३८’), कर्णधार राहुल शिंदे (३), श्रीकांत बोडीगम (३१’) व हरीश शिंडगी (६७’) यांनी गोल केले तर दिल्लीतर्फे सुशील चौहान याने एकमेव गोल केला.]]>