मागील तब्बल १८ तासांपासून चालू असलेला मुंबईचा पाऊसही भारताला विजयापासून रोखू शकला नाही. मॉरिशियसवर सहज विजय मिळवत मागील १६ सामन्यांत तब्बल १४ वा विजय मिळवला. मुंबई: संदेश झिंगानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या युवा भारतीय संघाने मुंबईच्या रिमझिम पावसात सावध सुरुवात केली. सुनील छेत्री, उदांता सिंघ, सी. के. विनिथ, गुरप्रीत सिंघ यांच्या अनुपस्थित खेळणाऱ्या भारताने सावध पवित्रा आजमावला. पाहुण्यांची दमदार सुरुवात फिफा क्रमवारीत तब्बल १६० क्रमांकावर असलेल्या पाहुण्या मॉरिशियसने मुंबईच्या पावसाळ वातावरणाला लवकरच जुळवून घेत दमदार सुरुवात केली. पाहुण्यांच्या मिड फिल्डने भारताच्या आक्रमण फळीला भेदत सुरुवातीपासूनच चेंडूवर ताबा घेत भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. भारताच्या बचाव फळीनेही काहीसा पाहुण्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु पाहिजे तसे यश मिळाले नाही. आठव्या मिनिटाला जीन स्टीव जोनाथन जस्टीनने एक सुरेख चेंडूला गोलपोस्ट धाडण्याचा सुरेख प्रयत्न केला परंतु भारताचा गोलकीपर सुब्रता पालने चतुराई दाखवत तितकाच सुरेख चेंडू पकडत पाहुण्यांचा प्रयत्न हाणून पडला. भारताला मात्र या सुरेख बचावाचा फायदा फार काळ घेता आला नाही. १५ व्या मिनिटाला भारताच्या अनस येदाथोडीकाला अगदी गोलपोस्टजवळ चेंडू घासून गेला आणि या संधीचा फायदा मॉरिशियसला झाला. मार्को डोर्झाच्या पायाला चेंडू लागत मॉरिशियसला आपलं खात उघडता आलं. भारताचं कमबॅक पहिल्या १५ मिनिटातच पाहुण्यांनी आघाडी घेतल्यानंतर घराच्या प्रेक्षकांसमोर खेळताना भारतीय संघावर दवाब वाढला. मॉरिशियसचे खेळाडूही तितकाच चांगला खेळ दाखवत भारताला दबावात आणू लागले. मधल्या फळीने आक्रमकता दाखवत एकामागोमाग सुरेख पास करत गोल करण्याचा केला. भारताच्या या प्रयत्नांना यश आलं ते ३७ व्या मिनिटाला. रॉलीन बोर्ग्सच्या पासचा रॉबिन सिंगने पुरेपूर फायदा उचलत मॉरिशियन गोलकिपर केवीनला चकमा देत भारताला महत्वपूर्ण अशी बरोबरी साधून दिली. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ १-१ अश्या बरोबरीत राहिले. दुसरा हाफ भारताचा पहिल्या हाफमध्ये बरोबरीत असणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या हाफसाठी तीन बदल केले. गोलकिपर सुब्रता पालच्या जागी अमरिंदर सिंग, रॉबिन सिंगच्या जागी भावांत सिंग व जॅकींचंद सिंगच्या जागी ‘लोकल बॉय’ निखिल पुजारीला संधी मिळाली. निखिलचा भारतीय संघासाठी हा पहिलाच सामना होता. संदेश झिंगानच्या सुरेख कामगिरीसमोर पाहून कर्णधार केविन बृचाही टिकाव लागला नाही. पहिल्या हाफमधील गोलर रॉबिन सिंगच्या जागी आलेल्या बलवंत सिंगने मिळालेल्या संधीचा फायदा घेत ६२ व्या मिनिटाला जेजेच्या पासवर गोल करीत भारताला २-१ अशी आघाडी देत आपलं वर्चस्व पुहा एकदा सिद्ध केलं. दुसऱ्या हाफमध्ये भारत एका वेगळ्याच जोशात दिसत होता. कर्णधार संदेश युवा खेळाडूंना वारंवार प्रोत्साहित करत होता. एका वेगळ्याच एनर्जीने भारतीय संघ खेळताना दिसला. मोहम्मद रफिक, होलीचारन नरझारी यांनीही चेंडूवर चांगलाच ताबा मिळवत पाहूणांना हैरावून सोडले. भारताने आघाडी घेतल्यानांतही बेंचवर बसलेल्या खेळडूंनाही संधी दिली. उत्तरार्धात भारत काहीच जास्तच आक्रमक झाला आणि मिळालेली आघाडी कायम ठेवत मालिकेतील पहिले यश प्राप्त केले. तास पाहिलं तर भारत सगळ्याच बाबतीत मॉरिशियाशी संघाच्या वरचढ होता. भारताने याचाही फायदा घेत चमकदार कामगिरी करीत त्याची प्रचिती आणली. भारताचा पुढील सामना २४ तारखेला सेंट किटीस नेव्हिल बरोबर होईल.]]>