मुंबई (दि. २१ ऑक्टोबर, २०१६): कर्णधार दियागो फॉरलेन च्या उपस्थित खेळणारा मुंबई सिटी संघ आपल्या घराच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्याच्या इराद्याने उताराला. कर्णधाराच्या संघात परतल्याने संघासाठी एक जमेची बाजू मिळाली. गन पालिकेत अगदी शेवटच्या क्रमांकावर असलेल्या गोवा संघासाठी आजचा सामना करो किंवा मरो असाच होता. दोन्ही संघानी सुरुवातीला बचावावर बाहेर देत सावध रित्या सामन्याची सुरुवात केली. दोन्ही संघांकडून सुरुवातीला काही चुका होत असल्यामुळे दोन्ही संघाना फ्री किक मिळाले परंतु उत्तम बचाव असणाऱ्या संघाना गोल करता आता नाही. सामान्याच्या १७ व्या मिनिटाला गोवा संघाचा प्रतेश शिरोडकर याला सामन्यातील पहिले यलो कार्ड मिळले. त्यानंतर दोन्ही संघानी सामन्यात आघाडी घेण्याचा दोन्ही संघ पुरेपूर प्रयत्न केला, परंतु कोणालाही गोल करता आता नाही. सामान्याच्या २८ व्या मिनिटाला मुंबईच्या लुसियन गोएन याला यलो कार्ड मिळालं. पहिल्या हाफच्या उत्तरार्धात गोवा संघाने आपला आक्रमण अधिक आक्रमक केला आणि मुंबईच्या बचाव फळीला भेदण्यास सुरुवात केली. ३७ व्या मिनिटाला गोवा संघाने मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घेतला परंतु मुंबईच्या गोलकिपरने सुरेख बचाव करीत गोव्याचा प्रयत्न फेल ठरावाला. ३९ च्य मिनिटाला मिळालेल्या फ्री केकचा गोवा संघाने पुरेपूर फायदा घेत ज्युलिओ दा सिल्वाच्या पासवर फेलिसबेनॉ याने सुरेख गोल करीत पाहुण्यांना महत्वाची आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये एफ. सी. गोवा संघ मुंबई सिटी एफ. सी. वर १-० अश्या आघाडीवर पोहोचला. उत्तरार्धात गोवा संघाने आपल्या आक्रमक खेळावर अधिक भर देत मुंबईला फार कमी संघी दिली. मुंबईला काही फ्री किकच्या संधी मिळाल्या परंतु त्यांना गोल करता आला नाही. ५२ व्या मिनिटाला मुंबईच्या प्रणॉय याला दुखापत झाली आणि त्याच्या जागी जॅकीचंद सिंग याला संधी मिळाली. परंतु गोवा संघही अधिक आक्रमक होत मुंबईला डोकं वर काढू दिलं नाही. दोन्ही संघाना अधून मधून कॉर्नर मिळत गेले परंतु दोन्ही संघांचा बचाव चांगला असल्यामुळे मुंबईला बरोबरी साधता आली नाही. मुंबईचा कर्णधार दियागो फॉरलेन याने आपल्या संघाला अधूनमधून सावरण्याचा प्रयत्न केला परंतु गोव्याच्या बचावफळीला त्यांना भेदता आलं नाही. ९० मिनिटांच्या खेळानंतर गोवा संघाने पूर्वार्धात मिळालेली आघाडी कायम ठेवत यजमानांना घराच्या मैदानावर धूळ चारली. या विजयाबरोबर एफ. सी. गोवा संघाने मोसमातील आपला पहिला विजय नोंदवत संघाला एक नवी ऊर्जा दिली. तर मुंबई संघ आजच्या सहा सामन्यात २ विजय व २ पराभवासह दुसऱ्या स्थानावर कायम असेल. घराच्या मैदानावर मुंबईचा हा मोसमातील पहिला पराभव आहे.]]>