यजमान रशियाला नमवून क्रोएशियाने गाठली उपांत्य फेरी. अंतिम चार संघ झाले निश्चित. रशिया: मागील तीन आठवड्यांपासून रशियामध्ये चालू असलेल्या फुटबॉलचे महाकुंभ आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोचले आहे. शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात क्रोएशियाने यजमान रशियाचा पेनल्टीवर ४-३ असा पराभव करीत अंतिम चारमध्ये आपले स्थान पक्के करीत उपांत्य फेरीच्या लढती निश्चित केल्या. तर याच बरोबर स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्जेंटिना, ब्राझील किंवा जर्मनी उपांत्य फेरीत दिसणार नाहीत. गतविजेता जर्मनी साखळी फेरीतच गारद झाल्याने मोठे मोठे अपसेट होण्यास सुरुवात झाली. शिवाय मेस्सीची अर्जेंटिनाही कशीबशी अंतिम १६ मध्ये पोचली. तर यजमान रशियाने सुरेख कामगिरी करीत सर्वांची मने जिंकली. उरुग्वेचा संघही आपले सर्व सामने जिंकत अंतिम आठमध्ये पोचला. रोनाल्डोनेही आपल्या चमकदार कामगिरीने संघाला बाद फेरीत आणले. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सने उरुग्वेचा २-० ने धुव्वा उडवीत लुईझ सौरेझचं विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न मोडलं. याच फ्रान्सने बाद फेरीच्या पहिला सामन्यात अर्जेंटिनाचा ४-३ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमने २-१ ने मात देत नेमयारचे स्वप्नाची धुळीस मिळवलं. शनिवारी झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा २-० ने पराभव करीत १९९० नंतर पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनचा फॉर्म पाहता तो इंग्लंडला यंदाचा विश्वचषक जिंकून देईल असेच वाटते. तर दुसऱ्या झालेल्या सामन्यात रशियाने क्रोएशियाला २-२ बरोबरीत राखले. पेनल्टी शूटआऊटने झालेल्या निकालात क्रोएशियाने रशियाला ४-३ ने पराभूत करीत १९९८ नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. आता मजा येईल ती उपांत्य फेरीत. पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगेल तो फ्रांस व बेल्जियम यांच्यात. मंगळवारी १० तारखेला होणाऱ्या या सामन्यातील विजेता भिडेल तो क्रोएशिया व इंग्लंड यांच्यातील विजेत्याशी.]]>