ढिसाळ गोलंदाजी मागच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारताने काही कमावले तर ते त्यांनी केलेली अचूक गोलंदाजी. भारताच्या वेगवान माऱ्याने विशेषतः कसोटीत पदार्पण करणारा जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांनी विराट कोहलीच्या संघाला सहा डावांत सर्व ६० गडी बाद करण्यास मोलाची कामगिरी बजावली. या त्रिकुटासह रविचंद्रन अश्विननेही उत्तम साथ देत हार्दिक पंड्या व इशांत शर्मा यांनीही उत्तम योगदान दिलं. त्या मालिकेनंतर असा वाटलं कि भारताची हि गोलंदाजी कुठल्याही माऱ्याला सामोरे जाण्यास तयार आहे. [embed align="center"]http://gty.im/910631740[/embed] पण हीच गोलंदाजी इंग्लंडमध्ये तितकीच प्रभावी ठरेल कि नाही हे येणारा काळच ठरवेल. सुरुवात करूया मोहम्मद शमीपासून जो दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. पण तिथून मैदानात व मैदानाबाहेर जणू त्याच्या मागे साडेसातीच लागली आहे. कौटुंबिक बाद व एक झालेला अपघात यांमुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाहिजे तसा खेळ त्याला करता आला नाही. नंतर फिटनेसमुळे त्याला अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी संन्यास मुकावे लागले. आणि आता यो-यो टेस्ट पास झाल्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. आणि म्हणून कोणत्याही सरावाविना यो इंग्लंडमध्ये गोलंदाजी करणार आहे. नक्कीच त्याच्यासाठी मोठी कसोटी असणार आहे. बुमरा – भारताचा सर्वात भरवशाचा गोलंदाज. अंगठ्याच्या दुखापतीमुळे तो मर्यादित षटकांच्या मालिकेस मुकला आणि या कसोटी मालिकेत पहिल्या तीन कसोटी सामन्यांनाही तो मुकणार आहे. बुमराप्रमाणेच भुवनेश्वर कुमारही तिसऱ्या कसोटीनंतर बोर्डाची मेडिकल टीम पडताळणी करून उरलेल्या दोन कसोटींसाठी समाविष्ट करणार कि नाही. दौऱ्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे ततोही तीन सामने मुकणार आहे. त्याचा तर संघात समावेश करण्यात आलेला नाही आणि तो आता भारतात परतणार आहे. जर तो या संपूर्ण मालिकेस मुकला तर भारतासाठी मोठा धक्का असणार आहे. कारण इंग्लडच्या या वातावरणात चेंडूला वळविण्याची कला भुवनेश्वरकडे चांगली आहे. म्हणजेच, शमी, इशांत शर्मा व मोहम्मद शमी हे भारताचे प्रमुख गोलंदाज असतील. कदाचित विराट कोहलीने या मोठ्या मालिकेसाठी अशी गोलंदाजी निवडली नसती. तथापि, कुलदीप यादवला संघात समाविष्ट केल्याने फिरकी विभाग काहीसा भरगच्च झालेला पाहावयास मिळत आहे. रवी अश्विन व रवींद्र जडेजा यांच्यासोबतच कुलदीपच्या सहभागाने गोलंदाजीला काहीसा आधार मिळणार आहे. शिवाय, भारताच्या माजी कर्णधार सौरव गांगुलीने अश्विन व कुलदीप यांना संधी देण्याची कल्पना सुचवल्याने कदाचित एक जुगाड खेळण्यास कोहलीही सज्ज आहे. फलंदाजी विभाग कोहलीवर अवलंबून दक्षिण आफ्रिकेच्या त्या दौऱ्यानंतर हे सिद्ध झाले आहे कि भारताची फलंदाजी कर्णधार कोहलीवर जास्तच अवलंबून आहे. अजिंक्य रहाणे , मुरली विजय, चेतवश्वर पुजारा व शिखर धवन यांसारख्या अनुभवाचा भरणा असणाऱ्या भारतीय संघात जर भारताला विजयश्री व्हायचं असले तर कोहलीसोबत या अनुभवाने जबाबदारी घेत मोठा सहभाग दिला पाहिजे. मुख्य म्हणजे, इंग्लंड असा एक देश आहे जिथे लाल चेंडूंत कोहली नेहमीच मागे आहे. मग या कसोटी मालिकेत त्याच्यावर धावा जमवण्याचा मोठा दबाव असेल. दरम्यान, निवडलेल्या या फलंदाजीच्या फळीत सराव सामन्याद्वारे प्रत्येक फलंदाजाला डुक चेंडूशी अनुकूल होण्यास पुरेसा वेळ मिळाला आहे. या दौऱ्यात रहाणे, विजय, रिषभ पंत व करून नायर यांनी भारत अ साठी इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळताना चार दिवसीय सामन्यात म्हणावा तसा सराव केला. शिवाय, यापूर्वी पंत व नायर यांनी वेस्ट इंडिज या संघाविरुद्ध प्रथम श्रेणी दमण्यात खेळताना धावाही केल्या. नायरने ९३ व ५५ धावा केल्या तर पंतने ३२१ धावांचा पाठलाग करताना नाबाद ६७ धावा केल्या होत्या. [embed align="center"]http://gty.im/830700814[/embed] या ‘अ’ संघाच्या सामान्यांबरोबरच भारतीय संघ इसेक्स बरोबर चेलम्सफोर्ड येथे एक तीन दिवसीय सामनाही खेळाला. शिवाय पुजारा यॉर्कशियार कडून काऊंटी क्रिकेटही खेळात असल्यामुळे तोही इथल्या वातावरणाशी समरस झाला असेल. भले त्याच्या बॅटमधून हव्या तश्या धावा निघत नसतील पण इथली परिस्थिती तो ओळखून आहे. सर्वोत्तम यष्ठीरक्षकाची कमी दौऱ्यात भारताला कमी भासेल ती या घडीचा सर्वोत्तम कसोटी किपर वृद्धिमान सहा याची. आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरण्यात तो कमी पडला आणि या मोठ्या मालिकेशी त्याला मुकावं लागलं . दिनेश कार्तिक त्याची जागा घेण्यास सज्ज आहे ज्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात यष्ट्यांमागे भारताला सांभाळलं होतं. [embed align="center"]http://gty.im/579362574[/embed] दिनेश कार्तिकसारख्या अनुभवी फलंदाजाच्या असण्याने भारतीय फलंदाजीला नक्कीच आधार मिळणार आहे, परंतु सहासारख्या चपळ यष्टिरक्षकाची सेवा भारतास मिळणार नाही. पण या इंग्लंडच्या वातावरणात असा किपर पाहिजे जो प्रत्येक वेळेस सर्तक असतो. कार्तिक व पंत नक्कीच चांगले फलंदाज आहेत पण जेव्हा यष्ठीरक्षणाची बारी येते तेव्हा सहा नक्कीच यांच्या पुढे असतो. या उच्चभ्रू मालिकेची सुरुवात उद्यापासून इजबस्टन येथून होणार असून दुसरा सामना ९ ऑगस्टला लॉर्ड्स येथे, नॉटिंगहमला १९ ऑगस्टपासून तिसरा, साऊथमटन ला ३० तारखेपासून चौथा तर सप्टेंबर ७ पासून शेवटचा सामना ओव्हल येथे होणार आहे.]]>