कोण आहे मयांक अगरवाल?
कर्नाटकाचा आघाडीचा मयांक अगरवाल आपल्या अलग शैलीने मागील दोन-तीन वर्षांपासून चर्चेत आला होता. मागील वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पणात त्याने चांगली कामगिरी करीत क्रिकेट पंडितांची वाहवाह मिळवली होती. तीन डावांत त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. लिस्ट ए क्रिकेटमधल्या ७५ सामन्यांच्या ७५ धावांत ४८.७१ च्या सरासरीने त्याने १२ शतके व १४ अर्धशतकांच्या साहाय्याने ३६०५ धावा केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट १००च्या वर आहेत. इंग्लंडमध्येही मयांकला खेळण्याचा चांगला अनुभव आहे. भारतीय ‘अ’ संघासाठी खेळताना त्याने ६ डावांत ४४२ धावा ठोकल्या आहेत. या धावा त्याने ११३ च्या स्ट्राईक रेटने केल्या असून यात तीन शतकांचाही समावेश आहे.
मुंबईकर श्रेयस अय्यरवर अन्याय?
जखमी विजय शंकरला दुखापतीमुळे विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांतून माघार घ्यावी लागली आहे. विजयच्या जागी कर्नाटकाचा आघाडीचा फलंदाज मयांक अगरवालची वर्णी लागली आहे. पण मयंकच्या संघातील समावेशाने आणखी एक चर्चेला उधाण आलं आहे. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर हा विजय शंकरच्या जागी योग्य खेळाडू ठरला असता असे काहींचे मत आहे. श्रेयस अय्यरने घरेलू क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. शिवाय इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये चांगली कामगिरी केली होती. दिल्ली कॅपिटल्स या संघाचं नेतृत्व करीत त्याने संघाला बाद फेरीत पोहोचवलं होतं. शिवाय फलंदाजीमध्येही त्याने १६ सामन्यांत ४६३ धावा ठोकल्या होत्या.
[embed align="center"]http://gty.im/977154944[/embed]२०१७ साली भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केल्या अय्यरने भारतासाठी आतापर्यंत सहा सामने खेळले असून पाच डावांत त्याने ४२च्या सरासरीने दोन अर्धशतकांच्या साहाय्याने २१० धावा केल्या आहेत. इंग्लंडमधेही खेळण्याचा अनुभवही असल्याने श्रेयस अय्यर या संघात फिट झाला असता असे बऱ्याच जाणकारांचे मत आहे.
]]>