भारत आणि पाकिस्तान यांचे राजकीय संबंध साऱ्या जगाला माहित आहेत. त्याच अनुषंगानेचा हे बॅनर झळकावले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकांत पुन्हा एकदा मोदी सरकार आल्यामुळे पाकिस्तान आणखीच घाबरलेला असावा. मोदी सरकारची काश्मीरविषयी भूमिकाही पाकिस्तानला ज्ञात आहे. कदाचित या विचारभावनेतून आजच्या सामन्यावेळी हे कृत्य केले असावे असेही तर्क लावले जातात.
काय घडले नक्की?
श्रीलंकेच्या डावाच्या चौथ्या षटकात जसप्रीत बुमराने श्रीलंकेचा कर्णधार करूनरत्ने याला धोनीकरवी झेलबाद करीत पहिला धक्का दिला. त्याच दरम्यान आकाशातून अगदी जवळच्या अंतरावर एक हेलिकॉप्टर ‘जस्टीस फॉर काश्मीर’ चे फलक घेऊन फेरी मारून गेले. त्यानंतर साधारणतः १७ व्या षटकादरम्यान आणखी एक हेलिकॉप्टर फिरकून गेले. या वेळेस काही दुसराच फलक प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ‘इंडिया स्टॉप गेनोसाईड अँड फ्री कश्मीर’ अर्थात ‘भारत नरसंहार थांबव आणि काश्मीरला मुक्त कर’ अश्या आशयाचा फलक यावेळेस पाहायला मिळाला.
आयसीसीचा सावध पवित्रा
सामन्यांचे आयोजन करण्याऱ्या आयसीसीने या प्रकरणावर सावध पवित्रा घेत घटनेचा निषेध केला. “हे पुन्हा घडलं त्यामुळे आम्ही खूपच निराश आहोत. आयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धेत अश्या प्रकारे विचित्र घटना ज्यात राजकीय संदेश फिरवले जातात, आयसीसी अश्या घटनांची निंदा करते. संपूर्ण स्पर्धेत आयसीसी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पूर्ण देशभरात अश्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करते. मागील घटनेदरम्यान स्थानिक पोलीस वेस्ट यॉर्कशायर पोलिसांकडून आम्हाला आश्वासन मिळालं होते. परंतु जे आज घडलं त्यामुळे आयसीसी खूपच असंतुष्ट आहे.” आयसीसीने आपली या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
अफगाणिस्तान-पाकिस्तान फॅन्स बलुचिस्तानवरून एकमेकांना भिडले होते
याच मैदानावर मागच्या शनिवारी खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विवादित बलुचिस्तानवरून चाहत्यांमध्ये हाणामारी झाली होती. सामना चालू होण्यापूर्वी झालेली मारामारी सामना संपल्यावरही मैदानात पाहायला मिळाली. त्यावेळेस तर दोन्ही देशांचे चाहते खुर्च्या, खाद्य पदार्थ एकमेकांवर भिरकावताना दिसले. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना तर धक्काबुक्कीही यावेळेस झाल्याचे पाहावयास मिळाले.
]]>