चेन्नई, दिनांक 14 नोव्हेंबर 2016: एफसी पुणे सिटीचे प्रशिक्षक अँटोनीओ हबास यांनी हिरो इंडिन सुपर लिगमधील अखेरच्या चार लढती सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. सर्व संघ कोणतेही भाष्य न करता उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 14 साखळी सामन्यांच्या टप्यानंतर पहिले चार संघ आगेकूच करतील. दिल्ली डायनॅमोज 17 गुणांसह आघाडीवर, तर एफसी गोवा दहा गुणांसह तळात आहे. आणखी चार सामने होणार असल्यामुळे कोणत्याही संघाचे उपांत्य फेरीतील स्थान नक्की नाही, तसेच कोणत्याही संघाची संधी संपुष्टात आली असे म्हणता येणार नाही. मंगळवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत पुणे सिटीच्या निर्धाराला प्रत्यूत्तर देण्याची चेन्नईयीन तयारी करती असताना दोन्ही प्रशिक्षकांनी याच मुद्यावर भर दिला. चेन्नईयीनचे प्रशिक्षक मार्को मॅटेराझी म्हणाले की, आम्हाला उपांत्य फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. गोव्याचा संघ सुद्धा (तळात असूनही) आशा बाळगत असेल तर आम्ही सुद्धा नक्कीच आशावादी राहू शकतो. गतविजेत्यांची कामगिरी यंदा अपेक्षेनुसार झालेली नाही. पाच सामन्यांतील त्यांची अपयशी मालिका आतापर्यंतची सर्वांत खराब कामगिरी आहे. त्यांनी 14 गोल पत्करले आहेत जे या मोसमात गोव्यासह सर्वाधिक आहेत. गेल्या दोन सामन्यांत त्यांनी सात गोल पत्करले आहेत. पहिल्या सात सामन्यांत मिळून पत्करलेल्या सात गोलच्या संख्येशी यामुळे बरोबरी झाली आहे. मॅटेराझी यांनी मात्र खचून जाण्याचे कारण नसल्याचे ठामपणे सांगितले. मागील सामन्यात केरळा ब्लास्टर्सविरुद्ध 1-0 अशी आघाडी असताना नायजेरीयाचा स्ट्रायकर डुडू ओमागबेमी याने गोल केला असता तर या सामन्यापूर्वीचे चित्र कसे बदलले असते हाच मुद्दा त्यांनी मांडला. ते म्हणाले की, आम्ही संघर्ष करीत राहू. आम्हाला स्टेडियमवर तीस हजार प्रेक्षकांची गरज आहे. मी सुद्धा लहान मुलगा असताना चाहता होतो. संघ जिंकत असतो तेव्हा जल्लोष करणे सोपे असते. आम्हाला प्रतिकुल परिस्थितीच्यावेळी प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांची गरज आहे.]]>