मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे संचालक रवी शास्त्री यांचा भारत्तीय संघाशी करार संपल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार भारतीय बोर्डाची त्रिसदस्यीय समितीने (सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, वी. वी. एस. लक्ष्मण) राहुल द्रविडला प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली आहे. राहुल द्रविड सध्या भारतीय युवा संघाचे प्रशिक्षण करीत आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली युवा संघ विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोचला होता. भारतीय संघाचा कसोटी क्रिकेट आणि युवा संघाचा विचार केला असता, बीसीसीआयला एखादा तरुण खेळाडू प्रशिक्षकपदी हवा आहे. जर राहुल द्रविडचा होकार आला तर त्याला २०१९ च्या विश्व चषक स्पर्धेपर्यंत भारतीय बोर्ड प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे.]]>