मुंबई: भारतात फुटबॉलचा प्रसार मागील काही वर्षांपासून चांगलाच होत चाललं आहे. इंडियन सुपर लीगच्या माध्यमातून फुटबॉल घरोघरी पोचला आणि मागील वर्षी झालेल्या अंडर-१७ विश्वचषकाने भारतीय फुटबॉलमध्ये वेगळेच विश्व निर्माण केले. यात आता भर म्हणजे येत्या २७ तारखेला नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणारी बार्सिलोना वि. ज्युवेंट्स यांच्यातील होणार लिजंड्स सामना. भारतात फूटबॉलचा प्रसार अधिकाधिक व्हावा यासाठी मुंबई फूटबॉल असोशिएशनचे अध्यक्ष व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतामध्ये फुटबॉलचे क्रेझ खूपच आहे. भारतीय फुटबॉल प्रेमी रात्र-रात्र जागत युरोपियन, स्पॅनिश लीगचा आनंद घेतात. तसेच तेथील खेळाडूंना अक्षरशः देव मानतात. हीच बाब लक्षात घेत फुटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनचे संस्थापक कौशिक मौलिक यांनी भारतात हा सामना खेळण्याची संकल्पना आखली आणि आता ती प्रत्यक्षात उतरवली. हि मंडळी येणार भारतात दोन्ही संघांत फार मोठी-मोठी नावं आहेत. फिफा विश्वचषकात खेळलेले अनेक दिग्गजही दिसणार आहेत. यात बार्सिलोना संघातील डेव्हिड ट्रेझग्युट, एडगर डेव्हिड, पाओलो मोण्टेरो, मार्क लुलिआनो, फॅब्रिझिओ रावानेली यासारखे अनेक स्टार खेळणार आहेत. तसेच ज्युवेंट्समधून युआन कार्लोस रॉड्गेज, जुलिओ सालिनास, जोस एडमिलसनसह अनेक दिग्गज मुंबानगरीत येतील. विशेष म्हणजे जगातील सर्वात मौल्यवान व सर्वांचा लाडका असलेल्या लियो मेस्सीने आपली सही असलेली जर्सी आदित्य ठाकरे यांना या सामन्यातील प्रेमाचं प्रतीक म्हणून गिफ्ट दिली.]]>