स्वातंञ्यविर सावरकरांनी मार्सेलिसमध्ये मारलेल्या ऐतिहासिक उडीला १०६ व्या वर्षानिमित्त भगूर येथे विशेष कार्यक्रम

८ जुलै स्वातंत्र्यसुर्य वीर सावरकर यांच्या मार्सेलिस बंदरात थांबलेल्या मोरीया बोटीवरुन मारलेल्या उडीस १०६ वर्षे आज पुर्ण होत आहेत… सकाळी आज सुर्य जेंव्हा उगवला तोच मुळी या स्वातंत्र्ययोध्दास नमन करुन… सकाळी साडेसहाच्या सुमारास मारलेली उडी त्रिखंडी गाजली…. २८ फुट खोल सागरात… बोटीची डागडुजी करण्यासाठी बांधलेला साधारण अडीच फुटाचा रँम्प चुकवुन अडीच फुटाच्या रुंद तसेच अंदाजे सहा साडे सहा फुट उंचीवर असलेल्या पोर्टहोल मधुन प्रचंड उर्जा एकवटुन मारलेली ही उडी… हे तितक्यातच थांबत नाही तर मागे बंदुकीच्या सु सु सुटणाऱ्या गोळ्या चुकवुन साधारण ९ फुटांची शेवाळलेली भिंत कुठल्याही आधाराविना सरसर चढुन जाणे हे कोणा साधारण व्यक्तीच्या आवाक्यातील गोष्ट नव्हे ते केवळ आणि केवळ तमाम देशभक्त नागरीकांचे दैवत स्वा.सावरकरच करु शकतात …. आजच्या दिनी स्वातंत्र्यवीरांना कोटी कोटी दंडवत …! विनंम्र अभिवादन ….!!]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *