श्री मंगळ देव ग्रह मंदिर समस्त भारतातील अतिप्राचीन अतिदुर्मिळ व अतिजागृत मंदिर

अमळनेर तालुक्यातील मंगळग्रह मंदीराबद्दल माहिती अमळनेर येथे महाराष्ट्रातील एकमेव पुरातन असे मंगळग्रह मंदिर आहे. मंगळग्रहाच्या जगातील दोन मंदिरांपैकी हे एक आहे. सदर मंदीर हे संपूर्ण भारतात फक्त दोन ठिकाणी आहेत 1) पश्चिम बंगाल 2) महाराष्ट्रात अमळनेर तालुक्यात चोपडा -अमळनेर राज्य महामार्ग क्रं-१४ वरती आहे. सदर मंदीरमध्ये दर मंगळवारी प्रचंड प्रमाणात दर्शनकरीता भाविकांचा ओघ असतो. तसेच मंदीर परीसरात बगीचा असल्याने दाट वृक्ष लागवड केल्याने सदर परीसर खुपच आल्हाददायक व प्रसन्न वाटतो त्यामुळे इतर दिवशीही मंदीर परीसरात खुप गर्दी असते. या मंदिर परिसराच्या विकासासाठी मा.आमदार कृषिभुषण साहेबराव पाटील यांनी सर्वांगिण आराखडा आखला होता आणि याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या शिफारसीनुसार २० डिसेंबर २०१२ रोजी मंगळग्रह मंदिराचा जिल्हा पर्यटन वृहत आराखड्यात समावेश करण्यात आला होता. मंगळ ग्रह मंदिराचे धार्मिक पाविञ्य व महत्व जपत आपण सर्व अमळनेरकर या ठिकाणाला एक प्रेक्षणिय आणि निसर्ग सौदर्याने परीपूर्ण स्थळ म्हणून विकसित करण्यात यशस्वी झाले आहत. येथील उद्यानास वनस्पती शास्त्रानुसार परीपुर्ण करण्यातही आपण प्रयत्नशिल आहात ही आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात या स्थळाला पर्यटन केंद्र म्हणून मान्यता मिळावी व तसा पर्याप्त निधी शासनाने द्यावा अशी अपेक्षा आहे. जाणकारांच्या मते संपूर्ण भारतात फक्त दोन ठिकाणी स्वतंत्रपणे श्री मंगल देव ग्रह देवाचे मंदिर आहे. अमळनेरचे श्री मंगल देव ग्रह मंदिर कोणी बांधले ? मूर्तीची स्थापना कोणी केली व केव्हा केली ? या बाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही . श्री मंगळ देव ग्रह मंदिर अत्यंत दुर्मिळ व जागृत स्थान असल्याने सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे . ज्या मुला मुलीना मंगळ आहे अशा मुला मुलींना लग्नाकरिता अडचण निर्माण होते त्या करिता येथे अभिषेक व पूजा केली जाते. मनोहारी मंदिरात विराजमान श्री मंगळ ग्रह मंदिरात शीस्तबध्द प्रवेश करण्यासाठी रांग लावणाऱ्या भाविकांकरिता सुंदर शेड बांधण्यात आली आहे. बाराही महिने मन प्रसन्न करणारा तुळस बगिचा, बालकांना खेळण्यासाठी अनेक साधने असलेला व वनराईने नटलेला रोटरी गार्डन, मंगळ वनातील बंधाऱ्यात साठलेले पाणी म्हणजे निसर्गाचा साक्षात आरसाच… तुळसी बगीच्यातील प्रसन्नवदन भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर नितांत सुंदर कारंजा व रोषणाई… नवकार कुटी व त्या खालील भगवान श्री शंकराची मूर्ती व जटातून बरसणाऱ्या धारा व धबधबा असे मनोहरी दृष्य पहावयास मिळते. दर मंगळवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत फक्त १५ रुपयात महाप्रसाद उपलब्ध असतो. श्री मंगळ ग्रह संस्थानाची वेबसाईट – www.mangalgraha.in श्री मंगळ देव ग्रह मंदिर, चोपडा रोड ; अमळनेर, जिल्हा:- जळगाव. (महाराष्ट्र) संकलन:- श्री. सागर कुळकर्णी युवा सह्याद्री प्रतिनिधी अमळनेर]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *